जीएसटीवाढीचा शॉक

30 Jun 2022 12:22:54
 
gst
 
 
 
 

नवी दिल्ली : देशातील वाढत्या महागाईच्या झळांनी सर्वसामान्य जनता पोळली जात असताना आत त्यात अजून जीएसटी दरवाढीची भर पडली आहे. येत्या १८ जुलै पासून ही दरवाढ लागू करण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेत घेण्यात आला. या परिषदेत पाकीट बंद आणि लेबल असलेल्या वस्तूंवरच्या जीएसटी दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व पदार्थांवर आता ५ टक्के जीएसटी लागू होणार आहे
 
 
 
या वस्तूंमध्ये पाकिटबंद मासे, दही, पनीर, मध, सोयाबीन, मटार यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. यांव्यतिरिक्त बँकांकडून काढल्या धनादेश सेवा, टेट्रा पॅकमधले पदार्थ यांवर १८ टक्के, ऍटलास, नकाशा यांसारख्या वस्तूंवर १२ टक्के जीएसटी लागू होणार आहे. याच बैठकीत गोव्याच्या अर्थमंत्र्यांनी कॅसिनो, घोड्यांच्या शर्यती, ऑनलाईन गेमिंग यांच्यावरील करांचा विचार करावा अशी मागणी केल्यामुळे यांच्यावरचा प्रस्ताव मंत्रिगटाकडे पुनर्विचारासाठी पाठवण्यात येणार आहे. या दरवाढीने आता देशात काही जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये वाढ होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढलेली महागाईपासून भारतीय अर्थव्यवस्था अलिप्त राहू शकत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून ही दरवाढ झाली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0