फडणवीसांचा 'मास्ट्ररस्ट्रोक' तर सोशल मीडियावर 'मिम्स'ची चलती!

30 Jun 2022 20:39:09
Masterstock
 
 
 
मुंबई : राज्यात राजकीय उलथापालथ सुरु असताना सोशल मीडियावरील मीम्समेकर तरी कसे शांत बसतील? एकनाथ शिंदे यांच्या बंडापासून ते गुवाहाटी मध्ये राहणाऱ्या आमदारांचा व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंग पर्यंत. तसेच बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेई पर्यंत. सोशल मिडियावर वेगवेगळे मिम्स व्हायरल होत आहे.

 
Masterstock
 
 
 
 
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. पण शपथविधीच्या आधीच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी मास्ट्ररस्ट्रोक खेळला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा केली. यावरून सोशल मीडियावर चांगलेच मिम्स व्हायरल होतं आहे. 'जोर का झटका', 'चाणक्य', 'सत्ता में आता हूं समझ मे नही' अश्या आशयाचे मिम्स दिसत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
"राज्याचा विकास हे मुख्य उदिष्ट असणार आहे. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व पुढे नेणार आहे. महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेता येत नव्हते", असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यातील विविध भागांमध्ये एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री होणार ही घोषणने नंतरच जल्लोष सुरु झाला. तर "मी पुन्हा येईन म्हणणारे", उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बॅकफूटवर राहून मास्टरस्ट्रोक लावला आहे. यावरून आता सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत.
 
Powered By Sangraha 9.0