नवी दिल्ली : देशात जातीयतावाद पसरविण्याचे मुख्यालय म्हणून काँग्रेस पक्ष कार्यरत आहे. त्यांच्या देशभरात अनेक शाखा असून तीस्ता सेटलवाड या त्या अनेक शाखांपैकी एक आहेत, असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत लगाविला.
जाकिया जाफरी यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावून सर्वोच्च न्यायालयाने २४ जून २०२२ रोजी ऐतिहासिक निर्णय दिला होता. या निर्णयानंतर मानवी हक्कांच्या रक्षणाचा ठेका घेतल्याप्रमाणे वागणाऱ्या अनेकांचा बुरखा फाटला आहे. गेली अनेक वर्षे जगातील सन्मानित नेता असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात खोटा अजेंडा रेटणाऱ्या विशिष्ट इकोसिस्टीमला सर्वोच्च न्यायालयाने उघडे पाडले आहे. अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने कथित सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करून सत्य उघड केले असल्याचे भाटिया म्हणाले.
देशात जातीयतावाद पसरविणारे मुख्यालय म्हणजे काँग्रेस पक्ष असल्याची टिका गौरव भाटिया यांनी केला. ते पुढे म्हणाले, काँग्रेसने जातीयतावाद पसरविण्यासाठी देशभरात अनेक शाखा उघडल्या असून तीस्ता सेटलवाड या त्या अनेक शाखांपैकी असल्याचा टोला भाटिया यांनी लगाविला. तीस्ता सेटलवाड यांनी दंगलग्रस्तांसाठी लढा देत असल्याचे भासवून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सेटलवाड यांच्यासह काँग्रेसचाही खरा चेहरा देशासमोर आल्याचे भाटिया यांनी यावेळी सांगितले.