संशयास्पद विद्युत मीटरची टोरेंटकडुन विशेष तपासणी मोहिम

28 Jun 2022 19:36:34
 

टोरेंट पॉवर
 
 
 
 
ठाणे : टोरेंट पॉवरद्वारे संशयास्पद विद्युत मीटरची विशेष तपास मोहीम सुरू करण्यात आली आहे. शिळ - मुंब्रा - कळवा परिसरातील ३० हजारहुन अधिक वीज मीटर सतत अनपेक्षितपणे कमी वापरासाठी टोरेंट पॉवर लिमिटेडच्या तपास यादीत आलेले आहेत. यापैकी २० हजार मीटरचा वापर शून्य असल्याने टीपीएलचे अधिकारी संशयग्रस्त झाले आहेत. उर्वरित १० हजार मीटरचा वापर ० ते ३० च्या श्रेणीत आहे. जो देखील एक विसंगती मानला जातो. या संशयास्पद मीटरच्या वस्तुस्थितीची पडताळणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहिमेचे आदेश देण्यात आले आहेत.
 
अपवादात्मकपणे कमी वापर असलेल्या ग्राहकांसाठी घरोघरी भेटी देऊन, ग्राहकांनी मीटरमध्ये गैरप्रकार केले असल्यास, ते ओळखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी काही खरी प्रकरणे असू शकतात. ज्यात ग्राहकांकडून विजेचा खप वास्तविक कमी आहे. तथापि, शून्य किंवा कमी वापर दर्शविणाऱ्या मीटरची सध्याची संख्या खूप जास्त आहे आणि मीटर बायपास, मीटरमध्ये छेडछाड, थेट अथवा अनधिकृत वापर इत्यादीसारख्या गैरप्रकारांमध्ये काही ग्राहक गुंतलेले असतील याची शक्यता नाकारता येत नाही, वा काही दोषी आढळ्यास टोरेंट द्वारे दोषींविरुद्ध विद्युत कायदा २००३ च्या संबंधित मार्गदर्शक तत्त्वांनुसार लागू कारवाई केली जाईल.
वीजचोरी हा फौजदारी गुन्हा आहे. टोरेंटने ग्राहकांना विद्युत उपकरणांमध्ये हस्तक्षेप करून विजेचा अनधिकृत वापर न करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे असुरक्षित विजेचे जाळे निर्माण होते आणि त्यामुळे विद्युत अपघात होऊन जीवितहानी देखील होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
Powered By Sangraha 9.0