व्हाईट गुड्स पीएलआय योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १५ उद्योगांची निवड

28 Jun 2022 19:05:03

PLI- 
 
 
 
नवी दिल्ली : ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानास बळ देण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘प्रॉडक्शन लिंक्ड् इन्सेन्टिव्ह’ अर्थात पीएलआय योजनेंतर्गत केंद्र सरकारने व्हाईट गुड्स पीएलआय योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला या योजनेंतर्गत टेलिव्हिजन, एअर कंडिशनर आणि एलईडी दिवे या घटकांच्या निर्मितीसाठी सरकार १५ कंपन्यांना प्रोत्साहन देणार आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण १ हजार ३६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
देशांतर्गत उत्पादनाला चालना देऊन रोजगार वाढवण्यासाठी सरकारने विविध क्षेत्रांसाठी पीएलआय योजना जाहीर केली आहे. भारतातच टेलिव्हिजन, एअर कंडिशनर आणि एलईडी दिवे आणि त्यांच्यासाठी आवश्यक घटकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन देशातच सुरू करण्यासाठी, सरकारने या क्षेत्रासाठी जीएलआय योजना जाहिर केली असून त्यास व्हाईट गुड्स पीएलआय असे नाव देण्यात आले आहे.
 
 
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १९ कंपन्यांनी अर्ज केले होते. एलजी इलेक्ट्रॉनिक्स, मित्सुबिशी इलेक्ट्रिक, अदानी कॉपर ट्यूब्स, जिंदाल पॉली फिल्म्स, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, विप्रो, गेको एअरकॉन, स्टारियन इंडिया आणि स्वामिनाथन एंटरप्रायझेस या कंपन्यांचा त्यामध्ये समावेश होता. पीएलआय योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात या कंपन्यांनी एअर कंडिशनर आणि एलईडी दिवे यासाठी घटक तयार करण्यासाठी अर्ज केला होता. पीएलआय योजनेच्या दुस-या टप्प्यांतर्गत ज्या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी सहा एअरकंडीशनर उत्पादक आहेत. या कंपन्यांनी ९०८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्याच वेळी, नऊ कंपन्या एलईडी लाईटचे घटक उत्पादित करणार असून त्यांनी ४६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या १५ कंपन्या पाच वर्षात २५ हजार ५८३ कोटी रुपयांची उत्पादने तयार करणार आहेत. यामुळे ४ हजार लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे.
 
 
या आहेत योजनेतील कंपन्या
एअरकंडिशनर – अदानी कॉपर ट्युब लिमिटेड, एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, स्टारियन इंडिया प्रायव्हेट लिमिडेट, कायनेस टेक्नॉलॉजी इंडिया लिमिडेट, मित्सुबिशी इलेक्ट्रीक प्रायव्हेट लिमिटेड, स्वामीनाथन एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड.
 
 
एलईडी लाईट्स – जिंदाल पॉलिफिल्म लिमिटेड, सहारा सेमीकंडक्टर प्रायव्हेट लिमिटेड, कोणार्क फिक्चर्स लिमिटेड, विप्रो एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड, ल्युमेन्स एअरकॉन प्रायव्हेट लिमिटेड, एसव्हिएन ओप्टो, क्रॉम्टॉन ग्रीव्हज्, इलिन इलेक्ट्रॉनिक्स, इस्को कास्टिंग अँड इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड.
Powered By Sangraha 9.0