जेष्ठ उद्योगपती पल्लोनजी मिस्त्री काळाच्या पडद्याआड

28 Jun 2022 15:11:34
 
shapoorji
 
 
 
मुंबई : देशातील सर्वात जुन्या उद्योगसमूहांपैकी एक असलेल्या पालनजी ग्रुपचे चेअरमन पल्लोनजी मिस्त्री यांचे मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशातील सर्वात जुन्या उद्योगसमूहांमध्ये शापूरजी पालनजी उद्योग समूहाचे नाव घेतले जाते. तब्बल दीडशे वर्षांचा इतिहास असणाऱ्या या समूहाने राष्ट्र उभारणीत मोठे योगदान दिले आहे. पल्लोनजी यांना भारत सरकारकडून २०१६मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
 
 
 
जल ऊर्जा, रियल इस्टेट , बांधकाम, अभियांत्रिकी यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये आणि ५० देशांमध्ये पालनजी समूहाचा व्यवसाय विस्ताराला आहे. टाटा समूहामध्ये १८.३७ टक्के हिस्सा या समूहाचा आहे. पल्लोनजी यांनी २००३ मध्ये भरतोय नागरिकत्व सोडून आयर्लंडचे नागरिकत्व स्वीकारले होते. ब्लूमबर्ग निर्देशांकानुसार ते जगातील ४१व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. पल्लोनजी यांचे पुत्र सायरस मिस्त्री यांनी काही काळ टाटा समूहाचे अध्यक्षपद भूषवले होते.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0