पेट्रोलियम पदार्थाचा समावेश जीएसटीत करा - ठाणे लघुउद्योजक संघटनेची मागणी

28 Jun 2022 19:55:05
 

tesla
 
  
ठाणे : पेट्रोलसह अन्य इंधन पदार्थाचा समावेश (वस्तु व सेवा कर) जीएसटीमध्ये करण्याची मागणी जोर धरीत आहे.जीएसटी परिषदेच्या येत्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत इंधनाचा समावेश (पेट्रोलियम पदार्थ) वस्तू व सेवाकरात करावा. अशी विनंती ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (टिसा) वतीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व जीएसटी परिषदेकडे करण्यात आली आहे.अशी माहिती टिसाचे प्रसिद्धीप्रमुख आशीष सिरसाट यांनी दिली.
 
इंधनाचा समावेश वस्तू व सेवा करात केल्यास महागाईवर बऱ्यापैकी ताबा मिळवता येईल. तसेच लघुत्तम लघु,मध्यम उद्योगांना स्पर्धात्मक दृष्टीने लाभ होईल.अशी खात्री टिसाला वाटते. तसेच, स्पर्धात्मक स्तरावर फायदा होईल कारण की, सध्या अशा अनेक गोष्टीमध्ये पेट्रोलियम पदार्थ वापरले जातात.परंतु इंधनाचा वस्तू सेवाकरात समावेश नसल्याने त्यांना सेटऑफ देखील मिळत नाही. त्यामुळे त्यांना लेव्हल प्लेयिंग ग्राउंड मिळेल.अनेक उद्योगांना पेट्रोलियम पदार्थ त्यांचा कच्चा माल असतो, परंतु जीएसटीत समावेश नसल्याने मोठा फटका बसतो. असे मत टिसाच्या अध्यक्षा सुजाता सोपारकर यांनी व्यक्त केले.
Powered By Sangraha 9.0