शिंदे गटाकडून राज्यपालांना पत्र ; सरकारने बहुमत सिद्ध करण्याचा दावा!

27 Jun 2022 12:52:47

koshyari
 
 
मुंबई : बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि अजय गोगावले यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. शिंदे गटाला बजावण्यात आलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि अजय चौधरी यांच्या नियुक्तीलाही याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. तसेच, शिंदे गटाच्या आमदारांना पोलीस संरक्षण देण्याचीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे. यावर आज सुनावणी होणार आहे.
 
याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पत्र पाठवलं आहे. शिंदेंकडे ५१ आमदार असून पत्रामध्ये ३८ आमदारांनी पाठिंबा काढल्याचे सांगण्यात येत आहे. आमदारांनी पाठिंबा काढल्यामुळे सरकार अल्पमतात गेले आहे. सरकारकडे बहुमत नसल्याने मविआ सरकार सत्तेत राहण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांच्या अधिकारांचा आणि पदाचा गैरवापर करत आहे. असा दावा करण्यात येत आहे. यावर राज्यपाल काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0