शिवसेनेचा शेवटचा आमदार गेला तरी मी शिवसेनेसोबत राहणार: आमदार वैभव नाईक

27 Jun 2022 19:01:35

naik
 
मुंबई: बंडखोर गटात सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच आहे. सेनेतील ४० पेक्षा अधिक आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "शेवटचा आमदार शिवसेना सोडून गेला, तरी मी शिवसेनेतच राहणार" असे स्पष्ट वक्तव्य वैभव नाईक यांनी केले आहे.
 
"खुर्चीसाठी काहीजण पक्षाला सोडून जात आहेत. बंडखोर आमदारांच्या पाठीमागे भाजपा आहे. प्रताप सरनाईक, यामिनी जाधव या आमदारांवर भाजपने आरोप केले आहेत, चौकश्या सुरु आहेत. संजय राऊत हे दीपक केसरकारांच्या मतामुळे खासदार झाले नाहीत." असे म्हणत वैभव नाईक यांनी बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0