भारतीय कसोटी क्रिकेटची नव्वदी

25 Jun 2022 13:17:05

cricket
 
 
२५ जून हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात खूप महत्त्वाचा आहे. कारण याच दिवशी १९८३ ला आपण विश्वचषक जिंकलो तर नव्वद वर्षापूर्वी १९३२ साली पहीला कसोटी सामना खेळलो तो ही याच दिवशी. लॉर्डस मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताच्या मोहम्मद निस्सारने पहीला चेंडू टाकला तर भारताचे पहीले यष्टीरक्षक जनार्दन नवले या मराठी क्रिकेटपटूने पहीला चेंडू खेळण्याचा मान मिळविला.हा पहीलाच कसोटी सामना भारत १५८ धावांनी हरला.
 
पहीला कसोटी विजय
पहील्या कसोटी विजयासाठी भारताला तब्बल २० वर्षे वाट पहावी लागली १९५१-५२च्या कसोटी मालिके साठी भारताच्या दौर्‍यावर आलेल्या इंग्लंडला भारताने मद्रास (चेन्नई) येथे कर्णधार विजय हजारे यांच्या नेतृत्वात पंकज रॉय आणि पॉली ऊम्रीगर यांची शतके तसेच अष्टपैलु विनू मंकड यांचे सामान्यातील १२ विकेट्सच्या अद्वितीय कामगिरीच्या जोरावर एक डाव ८ धावांनी पराभूत केले.
 
 
सत्तरचे जादुई दशक
विक्रमवीर सुनील गावसकर,विश्वनाथ सोलकर तसेच चंद्रा,बेदी,वेंकट,प्रसन्ना ह्या चौकडीच्या जादुई फिरकिने पहिल्यांदाच आपण परदेशात मालिका जिंकल्या.
 
 
कपिल देव अवतरला
१९७८ च्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर कपिल देवने पदार्पण केल आपल्या अष्टपैलुत्वाच्या जोरावर त्याने अनेक सामने जिंकले.१९८३ ला आपल्या आक्रमक नेतृत्वाने वर्ल्डकपही जिंकून दिला.
 
 
तेंडुलकर युग
वयाच्या १६ व्या वर्षी कसोटी पदार्पण करणाऱ्या सचिन तेंडुलकरने पुढे आपले तेंडुलकर युगच निर्माण केले. चोवीस वर्षाच्या आपल्या यशस्वी कारकीर्दीत २०० कसोटी सामन्यांत सर्वाधिक ५१ शतके आणि सर्वाधिक १५९२१ धावा हा विश्वविक्रम केला जो आजतागायत अबाधित आहे.
 
 
कर्णधारांचे सुवर्ण युग
२००० साली सौरव गांगुली कर्णधार झाला आणि एक कर्णधारांचे सुवर्णयुग सुरु झाले कारण त्यानंतर आलेल्या कर्णधार धोनी आणि विराट कोहली यांनी आपल्याला कसोटी विजयाची सवयच लावली . २००० पर्यंत आपण ६८ वर्षांत केवळ ६१ सामने जिंकलो तर पुढील २२ वर्षांत आपण तब्बल १०७ सामने जिंकलो आहोत भारतातर्फे सर्वाधिक 68 कसोटी विजय मिळवणारा कर्णधार विराट कोहली याने भारताला २०२१च्या कसोटी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेले होते . ९० वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात भारत ५६२ कसोटीत १६८ विजय ,१७३ पराभव, २२० अनिर्णित तर १ सामना बरोबरीत (टाय) राखण्यात यशस्वी ठरला आहे.
 
 
९० वर्षांतील भारताची कसोटी क्रिकेट मधील कामगिरी
 
कसोटी- ५६२
 
डाव- ९७०२
 
नाबाद- १२९३
 
धावा- २८३९५३
 
उच्चांकी धावा - ३१९ (सेहवाग)
 
सरासरी - ३३.७६
 
शतक- ५२८
 
अर्धशतक- १२५६
 
शून्य- १०२५
 
झेल- ४९५९
 
यष्टीचीत - २३०
 
चेंडू- ५९७५७०
 
निर्धाव षटके- २३२११
 
धावा- २८४४८४
 
बळी - ८४४४
 
सरासरी- ३३.६९
 
डावात ५ बळी - ३६३
 
सामन्यात १० बळी - ५१
 
सर्वोत्तम. १०/७४
 
गोलंदाजी. (कुंबळे)
 
 
 
- विनायक केणी
 
 
Powered By Sangraha 9.0