माझ्या कार्यकर्त्याला वाचवा: गुवाहाटीतून एकनाथ शिंदेंची डॉक्टरांना विनंती

24 Jun 2022 16:26:35

Y 

 


ठाणे : डोंबिवलीतील शिवसेना उपशहरप्रमुख राम मिराशी यांची तब्येत २१ जून रोजी अचानक बिघडल्याने त्यांना डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिराशी यांची तब्येत बिघडल्याची माहिती शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मिळाली. गुरुवार, दि. २३ जून रोजी सायंकाळी साडे पाच वाजता शिंदें यांनी थेट एम्स हॉस्पिटल मधील डॉक्टरांना फोन केला. आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची काळजी घ्या, असे सांगून मिराशी यांच्या उपचाराविषयी माहिती घेतली. 


सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रास्थानी असलेल्या एकनाथ शिंदे यांनी प्रचंड ताण आणि व्यस्त असून देखील आपला सहकारी आजारी आहे हे समजताच फोनद्वारे त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. "'हॅलो डॉक्टर, मी एकनाथ शिंदे बोलतोय. आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत आहे". "त्यांची काळजी घ्या, काही लागलं तर सांगा". "माझा कार्यकर्ता जगला पाहिजे ही विनंती". अशा शब्दात शिंदे यांनी डॉक्टरांशी संवाद साधला. मिराशी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. परंतु २४ जून २०२२ रोजी  उपचारा दरम्यान मिराशी यांचे निधन  झाले.  
 
 
राज्यात प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. असे असून देखील आपला नेता आपल्यावर लक्ष ठेवून आहे. आपल्याला काही कमी पडू नये याची काळजी घेतोय, याबद्दल शिंदेंच्या समर्थकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
 
 
 
एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार फोडून शिवसेनेला आव्हान दिले आहे. साध्या आपल्यासोबत ४८ आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढून सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्याकडून कार्यकर्ते व आमदारांना भावनिक साद घातली जात आहे. यासगळ्याचा परिणाम बंडखोर आमदारांवर होण्याची शक्यता नाकारता येत. असे असून देखील शिंदे अत्यंत शांत आहेत. आपल्या कार्यकर्त्यांची काळजी घेत आहेत, याबद्दल कार्यकर्त्यांकडून शिंदेंच कौतुक केलं जात आहे. 
 
  
 
 
Powered By Sangraha 9.0