शिंदेंची मनधरणी करायला गेलेले रवींद्र फाटक शिंदे गटात सामील

23 Jun 2022 17:57:43
Ravi
 
 
गुवाहाटी: विधान परिषद आमदार आणि शिवसेना नेते रवींद्र फाटक रॅडिसन ब्लू येथे आज पोहोचले. याच रॅडिसन ब्लूमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार वास्तव्यास आहेत. विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आपल्या ४० समर्थक आमदारांसकट आधी गुजरातच्या सुरतमध्ये त्यानंतर आसामच्या गुवाहाटीमध्ये गेले आहेत. या मुळे महाविकास आघाडी सरकार अल्प मतात आल्याची चर्चा आहे.
 
 
एकनाथ शिंदेंची मनधरणी करायला गेलेले फाटक आता त्यांच्याच गटात सामील झाले आहेत.काल, मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक शिवसेनेचे शिष्टमंडळ बनून या आमदारांच्या भेटीला सुरतमध्ये दाखल झाले होते. मुख्यमंत्र्यांचा निरोप ते एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोचवणार होते. एकनाथ शिंदेंचे मन वळवण्यात हे दोन्ही नेते यशस्वी झाले नाहीत. मात्र आज विधानपरिषद आमदार रवींद्र फाटक स्वतः शिंदे गटात सहभागी झाले आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमात आपण सर्वांनीच या दोघांची मैत्री पाहिली आहे. त्यामुळे हे घडणे अपेक्षित असल्याचे मानले जात होते. आता तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जग येऊन ते राजीनामा देणार कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0