मुख्यमंत्र्यांवर मुंबई पोलीसांची कारवाई होणार?

    दिनांक  23-Jun-2022 12:33:44
|

Tajindar Bagga
 
 
मुंबई : राज्यात सुरु असलेल्या हायव्होल्टेज ड्राम्यावर व्यक्त होत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (दि.२२ जून) जनतेशी फेसबुक लाईव्ह मार्फत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. 'सकाळी कोविड टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.', असा स्पष्ट उल्लेख यावेळी त्यांनी केला. त्यामुळे 'मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह असूनही वर्षावरून मातोश्रीवर जाताना ते लोकांच्या सानिध्यात आले. त्यामुळे त्यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.', अशी ऑनलाईन तक्रार पंजाबचे भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी मुंबई पोलिसांकडे केली असून एफआयआर नोंदवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हमध्ये पुष्टी दिली. संध्याकाळी मुख्यमंत्री वर्षावरून ठाकरे कुटुंबीयांसह मातोश्रीच्या दिशेने निघाले तेव्हा पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एका गाडीत होते तर मुख्यमंत्री दुसऱ्या गाडीत होते. मुख्यमंत्र्यांना समर्थन देण्यासाठी हजारो शिवसैनिक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. परंतु मुख्यमंत्री कोविड पॉझिटिव्ह असूनही ते वरळीत शिवसैनिकांना भेटण्यासाठी गाडीतून उतरले आणि त्यांच्या संपर्कात आले. एकूण पाहता त्यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी त्यांच्या विरूद्ध तक्रार नोंदवली असून मुंबई पोलिसांकडूनही एफआयआर नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर आता कारवाई होणार का? असा प्रश्न सध्या उद्भवतो आहे.
 

 
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.