शिवडी ‘बीडीडी’वरून राजकारणाला सुरुवात

23 Jun 2022 14:39:06

BDD
 
 
 
  
 
मुंबई : शिवडी येथील ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या जागेवरील ‘बीडीडी’ चाळींच्या पुनर्विकासासाठीच्या प्रकल्पाबाबत शिवसेनेने आरोप केल्यानंतर आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. याठिकाणी ‘बीडीडी’ चाळींचा पुनर्विकास व्हावा, अशी आमची मागणी असून त्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे, तर दुसरीकडे अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकल्पाबाबत केंद्र सरकारचे अद्याप कुठलेही धोरण नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्राच्यावतीने देण्यात आल्याचे समजत आहे. त्यामुळे वरळी ‘बीडीडी’ चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न पूर्णतः मार्गी लागण्यापूर्वीच आता शिवडी येथील ‘बीडीडी’ चाळींच्या पुनर्विकासावरून राजकारणाला सुरुवात झाली आहे.
 
 
 
केंद्र सरकारकडून स्पष्टोक्ती
 
“शिवडी येथील ‘बीडीडी’ चाळींच्या पुनर्विकासाच्या संदर्भात स्थानिक खासदारांकडून लोकसभेत एक मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप सरकारचे त्यावर धोरण नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे,” असे केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे.
 
 
 
पाठपुरावा केल्याचा सेनेचा दावा
 
“शिवडी येथील ‘बीडीडी’चाळींच्या पुनर्विकासाच्या बाबतीत आम्ही वारंवार केंद्र सरकारकडे पाठपुरावा केलेला आहे. मात्र, केंद्राने अद्याप त्या संदर्भात कुठलीही सकारात्मक भूमिका घेतली नाही. केंद्र सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणावरून आम्ही असमाधानी असून वेळप्रसंगी आम्ही आंदोलनही करू,” असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0