मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली तर संघर्षाची तयारी ठेवा : पवार

    दिनांक  23-Jun-2022 12:43:26
|

sharad pawar
 
 
मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे आघाडी सरकार अडचणीत आले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी २३ जून रोजी 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत सुप्रिया सुळे, जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. २२जून रोजी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती सहकार्यांना दिली.
 
"राज्यात सुरु असलेल्या घडामोडींबाबत मुख्यमंत्र्यांनी कणखर भूमिका घ्यावी", असे शरद पवार बैठकीत म्हणाल्याचे समजते. "राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभी आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे, जर सरकार गेलं तर संघर्षाची तयारी ठेवा." असे आवाहन पवारांनी या बैठकीत केले. "वेळ आली, प्रसंग पडला तर विरोधी बाकांवरही बसण्याची तयारी आहे. परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल." असे जयंत पाटील म्हणाले.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.