शिंदेंनी सेनेत आणलं, ठाकरेंनी वावरायला शिकवलं कोणता झेंडा घेऊ हाती?

दिपाली सय्यद यांचं ट्विट!

    दिनांक  23-Jun-2022 12:34:24
|

Deepali Sayyad
 
मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत. तर उद्धव ठाकरेंनी वर्षा सोडत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर दीपाली सय्यद यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळेस त्या भावुक झाल्या.उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे हे राम-लक्ष्मणाची जोडी आहे. ती तुटता कामा नये, असे भावूक वक्तव्य त्यांनी यावेळी केले होते.
 
याच पार्श्वभूमीवर आता दीपाली सय्यद यांच्यासमोर मोठे आव्हान असल्याची खंत त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केली. "सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू." असं दीपाली सय्यद ट्विटरवरून म्हणाल्या.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.