...अखेर अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर

    दिनांक  23-Jun-2022 13:05:25
|

999
 
 
  
 
 
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तिला बुधवारी ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. नवी मुंबई येथे दाखल ‘अ‍ॅट्रोसिटी’च्या गुन्ह्यात तिला यापूर्वीच जामीन मिळालेला आहे. त्यामुळे केतकीची कारागृहातून मुक्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेवर ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तिला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात तिला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान, केतकीने कळवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी जामीन मिळवण्यासाठी वकिलामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर बुधवारी न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. २० हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियात टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाशिकचा विद्यार्थी निखिल भामरे यालाही जामीन मंजूर झाला आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.