मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थिर राहणार की कोसळणार याची चर्चा राजकारणात सुरु असतानाच भाजपचे प्रवक्ते अजय सेहरावत यांनी बुधवार दि. २२ जुन रोजी त्यांच्या फेसबुकवर एक पोस्ट करत या चर्चेत आणखी भर घातली आहे. ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमुळे राजकीय वातावरणात अजून खळबळ माजणार आहे.
या फेसबुक पोस्टमध्ये अजय सेहरावत यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये कंगना राणावत यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. कंगना यांनी, "आज मेरा घर टूटा है, कल तुम्हारा घमंड तुटेगा, ये वक्त का पहिया है, याद राखना, ये एक जैसा नही राहता" असे वक्तव्य केले होते. याच मुद्द्यावर अजय शेरावत यांनी "कंगना राणावतचं 'ते' भाकीत ठरलं खरं! "उद्धव ठाकरे तेरा घमंड तुटेगा!" अशा स्वरूपाची पोस्ट फेसबुकला पोस्ट केली आहे.
या विधानाचा आणि सध्या सुरु असलेल्या परिस्थितीचा संबंध अजय सेहरावत यांनी जोडला आहे. कंगनाची हे विधान खरे ठरले आहे असे अजय सेहरावत यांचे मत आहे. त्यामुळेच त्यांनी ही पोस्ट केली आहे. महाविकास आघाडीला धोका असताना, एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी होईल का? या वर सर्वांचेच लक्ष लागले आहे.