ठाणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

    22-Jun-2022
Total Views |

yoga 999
 
 
 
 
 
ठाणे : आमदार संजय केळकर यांच्या ‘संस्कार सेवाभावी’ संस्थेच्या मार्फत ढोकाळी येथील शरदचंद्र पवार मिनी स्टेडियममध्ये मंगळवारी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये ‘पतंजली योग’ समितीचे मोलाचे सहकार्य लाभले. या शिबिरामध्ये भाजपचे पदाधिकारी हेमंत म्हात्रे, अल्केश कदम, मत्स्यगंधा पवार, तृप्ती सुर्वे, महेश ताजणे डॉ. ताजने, राधा शर्मा, जितेंद्र मढवी, स्नेहा पाटील, चंद्रमा चव्हाण, रविराज रेड्डी आदीसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. आयोजक दत्ता घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
 
 
 
योग विद्याधाम, अंबरनाथ
 
 
 
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अंबरनाथ येथील योग विद्याधाम व भाजपच्या माजी नगरसेविका अनिता संजय आदक यांच्या संयुक्त विद्यमानाने योगाभ्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भगिनी मंडळ शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर पं. दीनदयाळ उपाध्याय सार्वजनिक वाचनालयात योगाभ्यास करून हा योग दिन साजरा करण्यात आला. योग विद्याधामचे शिक्षक वैशाली कुमावत, माधुरी संन्यासी यांनी योग वर्ग घेतला. संध्या देशमुख व अंबरनाथ योग विद्याधामच्या प्रमुख मधुमती चव्हाण यांसह यावेळी भाजपचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय संतोष आदक, भाजयुमो शहर सचिव प्रज्वल मुधवेडकर, भगिनी मंडळ शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
 
 
 
डॉक्टर अ‍ॅण्ड इंजिनिअर्स फाऊंडेशन
 
 
 
‘डॉक्टर अ‍ॅण्ड इंजिनियर्स फाऊंडेशन’च्यावतीने मंगळवारी मुरबाड येथे आरोग्यम योगमार्गदर्शन शिबीर पार पडले. योग गुरू वर्षा टेकवानी व त्यांच्या शिष्य यांनी प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी भाजपचे मुरबाड शहरअध्यक्ष सुधीरभाई तेलवणे, महिला शहर अध्यक्ष छाया चौधरी व ज्योती गोडांबे यांसह अनेक महिला व पुरुषांनी योग शिबिरात सहभाग दर्शवला.
 
 
 
सम्राट अशोक विद्यालय
 
 
 
कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला. ‘पतंजली योग’ समितीचे प्रशिक्षक सतीश मुळवीकर, परमेश्वर जाधव, सुरेखा गायकवाड आणि एकता सिंग यांच्या बरोबर विद्यार्थ्यांनी योगासने केली. योग प्रशिक्षक आणि मार्गदर्शक सतीश मुळवीकर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले सातत्याने योगासने केली, तर मन प्रसन्न आणि सुदृढ राहते. शरीर निरोगी राहते. विद्यार्थ्यांबरोबर मुख्याध्यापक गुलाबराव पाटील व शाळेच्या शिक्षकांनी योग प्रशिक्षणात सहभाग घेतला.
 
 
 
भाजपतर्फे कल्याणमध्ये ५० ठिकाणी योग दिन साजरा
 
 
 
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्यावतीने ५० ठिकाणी ‘जागतिक योग दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांसह हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.‘स्ट्रेस टू स्ट्रेन्थ’ करिता सर्वांनी दररोज योगा व व्यायाम करावा, या उद्देशाने माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कल्याण शहरात ११ ठिकाणी बूथ स्तरावर व ३९ ठिकाणी प्रभाग स्तरावर योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी भाजप मंडल अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, शक्तिवान भोईर, अर्जुन म्हात्रे, कल्याण विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, प्रदेश सचिव प्रिया शर्मा यांनी परिश्रम घेतले.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.