ठाकरे सरकार कोसळणार? आदित्य ठाकरेंनी मंत्रीपदाचा उल्लेख हटवला!

22 Jun 2022 12:22:17

aaditya thackre
 
मुंबई: शिवसेना आमदार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर, आता ठाकरे सरकार कोसळणार का? यासंबंधी चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनीही ट्विटर हँडलवरून पर्यावरण मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे.
 
आदित्य ठाकरेंनी ट्विटर हँडलवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवून युवासेना प्रमुख असं ठेवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १ वाजता कॅबिनेट बैठक घेणार आहेत. त्यापूर्वी पर्यावरण मंत्री, पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवल्यामुळे ठाकरे सरकार कोसळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0