नवी दिल्ली: मागील २४ तासांमध्ये भारतात १२,७८१ नवीन कोरोना रुग्ण सापडले. दैनंदिन कोरोना रुग्ण 'पॉझिटिव्ह' येण्याचा दर चार टक्क्यांहून अधिक वाढला आहे. भारतातील कोरोनाबाधित आणि कोरोनामृत्यूंची संख्या अनुक्रमे ४,३३,०९,४७३ आणि ५,२४,८७३ आहे. देशातल्या राजधानी दिल्लीत कोरोनाचे १,०६० नवीन रुग्ण सापडले, तर सहा लोकांचा मृत्यू झाला. राज्यात २४ हजारांहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
याच दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी 'कोविड-१९' रोग संपुष्टात येत असल्याचे संकेत सुद्धा त्यांनी दिले आहेत. त्यांनी 'कोविड-19' लसीकरणाविषयी जनजागृती, डेटाच्या आंतरकार्यक्षमतेसह सक्षम डिजिटल आरोग्य प्रणाली आणि लसीच्या पुरवठ्यातील कमतरता दूर करण्यासाठी संशोधन आणि उत्पादन क्षमता बळकट करण्याची गरज अधोरेखित केली.