रश्मी वहिनींनीही केला मनधरणीचा प्रयत्न! पण एकनाथ शिंदे म्हणाले...

21 Jun 2022 16:05:43

maha mtb 1





मुंबई
: शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुरकारला आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे सक्रीय झाल्या आहेत. रश्मी वहिनी आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे दे दोघेही शिंदेंची सकाळपासूनच समजूत काढत आहेत. शिंदेंनी हे बंड पक्षाविरुद्ध नसून विचारधारेविरोधात असल्याचे त्यांच्याकडे स्पष्ट केलंयं. तसेच एकही आमदार फुटू देणार नाही. मात्र, आमचीही अडचण समजून घ्या, अशीही विनवणी शिंदे करत असल्याचीही सुत्रांची माहिती आहे.

महाविकास आघाडीतील घटकपक्षांतील अंतर्गत मतभेदांमुळेच ही शिंदे प्रामुख्याने नाराज आहेत. आमदारांना मी कुठेही घेऊन जाण्यासाठी आलेलो नाही. मात्र, पक्षातील नेता म्हणून माझी भूमिका मांडण्याचा मला पूर्ण अधिकार असल्याचेही शिंदेंनी सांगितले. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची ऑफरही शिंदेंना दिली आहे. मात्र, याउलट शिंदेनी भाजपशी युती करुन फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री, असा प्रस्ताव दिला आहे. रश्मी ठाकरेंमुळे हायवोल्टेज ड्राम्याचे मातोश्रीही केंद्र आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी वर्षा या निवासस्थानी आमदारांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. या बैठकीला मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडही पोहोचले होते.






Powered By Sangraha 9.0