डॉक्टर बनले देवदूत, 'त्या' महिलेचे वाचवले प्राण...

20 Jun 2022 13:18:58
 
chamerleni
 
 
नाशिक: नाशिक जवळील चामरलेणी डोंगर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. रविवार १९ जून रोजी फिरण्यासाठी आलेली पर्यटक महिला सुमारे १००फूट खोल दरीत पाय घसरून पडली. पायवाट अतिशय अरुंद असल्याने लक्ष विचलीत झाल्यास ही घटना घडल्याचे समजते. पर्यटक महिला दरीत कोसळल्यानंतर सोबतच्या पुरुषाला काय करावे ते समजेना. त्यावेळी नाशिकमधील डॉ. रविकिरण निकम आणि डॉ. गणेश शिंदे हे तेथून जात होते.
 
त्या व्यक्तीने ही सर्व घटना त्या डॉक्टरांना सांगितली. डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता दरीत उतरले. महिला बेशुद्ध अवस्थेत होती. त्यांनी महिलेची तपासणी करून तिच्यावर प्राथमिक उपचार केले. इतर पर्यटकांच्या मदतीने महिलेला दरीतून वर आणले, व पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉ. रविकिरण निकम आणि डॉ. गणेश शिंदे यांनी केलेल्या धाडसामुळे महिलेचे प्राण वाचले. महिलेच्या नातेवाईकांनी त्या देवदूतांचे आभार मानले. त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0