'चुकीला माफी नाही!' 'तो' पुन्हा आलायं : 'दगडी चाळ २'चा धमाकेदार टीझर

    दिनांक  20-Jun-2022 17:25:25
|
 
 

daddy
 
 
 
 
 
 
 
मुंबई : हिंदी, मराठी सिनेसृष्टी, मालिकांमधून कधी दिग्दर्शक, अभिनेता अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून लोकप्रिय झालेले बहुआयामी कलाकर मकरंद देशपांडे यांची 'दगडी चाळ' चित्रपटातील 'डॅडी' ही भूमिका चांगलीच गाजली होती. आता याच चित्रपटाचा सिक़्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. अभिनेता अंकुश चौधरी याने आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवर 'दगडी चाळ २' या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या टीझर चे अनावरण केले आहे.
 
 
 
 
 
 
टीझर शेअर करतना अंकुश म्हणतोय, ' तो परत आलाय!' 'तो' म्हणजे कोण तर, डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत अंगार , काटक शरीरयष्टी असलेला-गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’! 'दगडी चाळ' मधून 'चुकीला माफी नाही' म्हणणाऱ्या 'डॅडी’ नी म्हणजेच मकरंद देशपांडे यांनी आपल्या अभिनयातून चांगलाच दबदबा निर्माण केला होता. मंगलमुर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित , चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ २' येत्या १८ ऑगस्टला चित्रपटगृहात येत आहे.
 
 
 
 
 
 
 
धोधो कोसळणाऱ्या पावसात अनेक लोकांच्या गर्दीतून समोर येणारे अरुण गुलाब गवळी ऊर्फ डॅडी म्हणजे अर्थातच मकरंद देशपांडे यांना पुन्हा एकदा बघण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. संगीता अहिर यांनी यापूर्वी बॉलिवूड चित्रपटसृष्टीला अनेक एकाहून एक सुपरहिट असे चित्रपट दिले होते. निर्माती या भूमिकेतून बोलिवूडमध्ये नावलौकिक मिळवल्यानंतर संगीता अहिर या मराठी चित्रपटसृष्टीकडे वळल्या आणि 'दगडी चाळ' सारखा पहिलाच मराठी चित्रपट त्यांनी दिल्यानंतर आता त्याचच सिक्वेल 'दगडी चाळ २' घेऊन त्या सज्ज झाल्या आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.