केआरकेच्या ट्विटवर नेटकरी संतापले

    20-Jun-2022
Total Views |


krk

 
 



मुंबई : देशातील अनेक राज्यांमधून अग्निपथ योजनेविरोधात हिंसक विरोध सुरु आहे. विशेषतः याचा प्रभाव हा बिहार - उत्तर प्रदेश सारख्या राज्यांत जास्त दिसून येत आहे. परंतु, गुजरातमध्ये या लोकांकडून निदर्शनाचा प्रभाव दिसून येत नसल्यामुळे अभिनेता कमाल आर खान याने ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया देत म्हटले आहे की अग्निपथ योजनेविरोधात गुजरातमध्ये कोणताही विरोध होताना दिसत नाही. कारण ९९ टक्के गुजरातचे लोक लष्करात सामील होत नाहीत.

 
 
 
 

केआरकेचे हे ट्विट वाचून नेटकऱ्यांनी संतप्त होत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर म्हणत आहेत, आम्ही विरोध करत नाही कारण, गुजरातमध्ये निदर्शन करणाऱ्यांना पैसे देऊन निदर्शने केले जात नाही. तसेच येथे रोजगार निर्माण करण्यात लोक जास्त व्यग्र आहेत.

 
 
 
 

आयुष्यात मैदानाची एक फेरीसुद्धा पूर्ण मारली नसेल असे लोक अग्निपथचे फायदे सांगत आहेत, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर एक जण केआरकेला सवाल करतोय, कितपत असे ट्विट करुन पैसे कमवाल, त्यापेक्षा एखादा चित्रपट बनवा. एका युजरने केआरकेला उत्तर दिले आहे की, गुजरातचे ९९ टक्के लोक देशाचा जीडीपी वाढवण्याचे आणि अर्थव्यवस्था चालवण्यासाठी मेहनत करत आहेत.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.