सोशल मीडियावर #BoycottBrahmastraची मागणी

    दिनांक  20-Jun-2022 13:17:24
|

boycott
 
 
 
 
मुंबई : अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या आगामी चित्रपटाची चर्चा गेले अनेक दिवस रंगत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्याचा ट्रेलर बघून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकांची खूपच वाढली आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या VFX दृश्यांची जोरदार प्रशंसा केली जात आहे. यामधल्या 'केसरिया' या गाण्याने तर आधीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे परंतु, तरीही ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ट्वीटरवर #BoycottBrahmastra ट्रेंड होत आहे आणि याचे कारणही मोठे आहे.
 
 
 
 
 
रणबीर कपूरचा अभिनय आणि आलिया भट्ट सोबतची त्याची ऑनस्क्रिन केमिस्ट्री लोकांना भलतीच आवडलीआहे. थरारक अशा ट्रेलरमध्ये अॅक्शन आणि अॅडव्हेंचर पहायला मिळत आहे. व्हिडीओ पाहून अंगावर काटा उभा राहतोय असे अनेकजण म्हणतायत. अनेकजणांनी तर या सिनेमाची तुलना थेट हॉलिवूडशी केली आहे. एवढी प्रशंसा सुरु असताना आता ट्रेलरमध्ये लोकांना असे काही खटकले आहे की ज्यामुळे नेटकऱ्यांचा राग अनावर होतोय.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
एका प्रसंगात रणबीरने पायात चप्पला घालून मंदिरात प्रवेश केला आहे, एवढेच नाही तर उडी मारून घंटानाददेखील तो करताना दिसतोय. हे पाहून पाहिल्यानंतर लोकांनी आपला राग सोशल मिडीयावर व्यक्त केला आहे आणि सिनेमाचा नेषेध करत तो बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे. 'पायात बूट घालून मंदिरात जाणं...हेच तुमच्याकडून अपेक्षितच आहे. बॉलीवूड नेहमीच सनातन धर्माला दुखवण्याची एकही संधी सोडत नाही' अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. 'पायात बूट घालून मंदिराची घंटा वाजवणं...हाच साऊथ आणि हिंदी सिनेमातील मोठा फरक आहे. साऊथ इंडस्ट्री हिंदू संस्कृतीचा सम्मान करते', अशी देखील प्रतिक्रिया एकाने दिली आहे.
 
 
 
 
 
तर सुशांत सिंग राजपूतचे काही चाहतेसुद्धा या नेषेधात सामील होत 'ब्रह्मास्त्र'च्या विरोधात उतरले आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' च्या शोचे उदाहरण देत सुशांतच्या चाहत्यांनी जुन्या कटू आठवणी जागवल्या आहेत. त्या शो मध्ये आलिया भट्टने एका टास्क दरम्यान सुशांतला 'किल' करण्याच्या पर्यायाची निवड केली होती तर काहींना करण जोहरच्या पार्टीची आठवण आली, जिथे रणबीर सोबतच इतरही काही सेलिब्रिटींवर ड्रग्ज घेण्याचे आरोप लावण्यात आले होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.