अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांचे निधन

02 Jun 2022 13:52:10

pramod pandit joshi
 
 
 
 
 
कल्याण : अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांचे बुधवार, दि.१ जून रोजी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. मुंबईतील केईएम रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात मुलगा वेदराज आणि पत्नी वैशाखी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथे जोशी राहत होते. त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवसांपूर्वी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आल होतेे.
 
 
  
दरम्यान, अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी आंदोलन आणि श्रीराम मंदिर निर्माणासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले होते. प्रमोद जोशी हे अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ते होते. जोशी हे सुरुवातीपासूनच श्रीराम जन्मभूमी आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होते. श्रीराम जन्मभूमी विषयाअंतर्गत पुरातत्व विभाग आणि त्याच्याशी संबंधित कायदेशीर बाबींमध्ये त्यांचा सखोल अभ्यासही होता. त्यामुळेच कल्याणपेक्षा त्यांचा अधिक मुक्काम हा अयोध्या आणि दिल्लीमध्ये असायचा. तसेच, श्रीराम जन्मभूमीसोबतच श्री काशिविश्वनाथ मंदिरदेखील त्यांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता.
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0