मराठी भाषा पुढे न जाण्याचे मूळ आपल्या घरातच आहे - अरुण नलावडे

    दिनांक  18-Jun-2022 18:40:23
|


arun
 
 
 
 
मुंबई : नाटक,सिनेमा, मालिका अशा मनोरंजनाच्या तीनही माध्यमात अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे सध्या झी मराठीवरील ' मन उडू उडू झालं' या मालिकेत मनोहर देशपांडे ही भूमिका साकारत आहेत. या मालिकेत सध्या सुरु असलेल्या कथानाकाच्या निमित्ताने अरुण नलावडे यांनी दिलेल्या एका मुलाखतीत चर्चा करत असताना त्यांनी मराठी भाषे बाबत मनातली नाराजी बोलून दाखवली.
 
 
 
 
 
 
गेली अनेक वर्षे मराठी भाषेवरून अनेक मुद्दे समोर येत आहेत. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा, ती जोपासली जावी, जास्तीत जास्त लोकांनी त्याचे जतन करावे यासाठी अनेक स्तरावरून प्रयत्न सुरु आहेत. परंतु, अजूनही मराठीला भाषेला बहुमान मिळवण्यासाठी झटावे लागत आहे. मराठी भाषिक मुलेच जास्त करून मराठी भाषेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. मराठी साहित्य, नाटक यात ते बरेच मागे पडलेले दिसत आहेत.
 
 
 
 
 
 
 
यावर अरुण नलावडे यांनी आपले मत नोंदविले,' मराठी भाषा का पुढे जात नाही याचे मूळ आपल्या घरातच आहे.' शिवाय याला पालक जबाबदार असल्याचेही ते म्हंटले आहे. भाषेच्या मुद्द्यावर त्यांनी मांडलेले विचार अत्यंत परखड आणि प्रभावी आहेत. या शिवाय भाषा टिकण्यासाठी काय करायला हवं, कशा कलाकृती निर्माण करायला हव्या अशा अनेक मुद्यांवर त्यांनी भाष्य केले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.