'अग्निपथ' आंदोलकांचा धुडगूस, शाळेच्या बसवर हल्ला, ट्रेनवर फेकले पेट्रोल बॉम्ब..

18 Jun 2022 18:46:07
y
 
 
 
 
नवी दिल्ली: केंद्र सरकारने तिन्ही सशस्त्र दलांच्या सहकार्याने अग्निवीर योजनेचे अनावरण केल्यावर, ‘युवक’ आंदोलकांचा जमाव रस्त्यावर उतरला आणि ‘निदर्शने’ आणि मोर्च्यांच्या नावाखाली सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड सुरु केली आहे. तथाकथित सशस्त्र दलाच्या इच्छुकांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले, गाड्यांना आग लावली आणि त्याचा परिणाम विविध भारतीय राज्यांमधील जनजीवनावर होऊन ते ठप्प झाले आहे. आंदोलक सरकारी योजना पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अशाच आणखी एका घटनेत बिहारमधील दरभंगा येथे लहान मुले आणि शिक्षकांना घेऊन जाणाऱ्या शाळेच्या बसवर हल्ला करण्यात आला.
 
 
दरभंगा येथे हल्लेखोरांनी पोलिसांच्या वाहनांसह इतर वाहनांवर दगडफेक सुरू केल्याने ५ ते ६ वर्षे वयोगटातील शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस रस्त्यातच अडकली. दगडफेकीत पोलिसांच्या अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली, त्यामुळे बस आणि इतर वाहनांचे नुकसान झाले आहे. आरडा ओरडा व दगडफेक झाल्याने बस मधील लहान मुलं भीतीने घाबरली व रडू लागली. नंतर पोलिसांच्या मदतीने बस घटनास्थळावरून निघून जाण्यात यशस्वी झाली.
 
 
यूपीच्या मथुरामध्ये तथाकथित आंदोलकांनी रस्त्यावरून जात असलेल्या वृद्ध जोडप्यावर दगडफेक केली. आंदोलकांना दूर ढकलण्यासाठी आणि रस्त्यावर अडकलेल्या लोकांचे जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी पोहोचून त्यांच्यावर गोळीबार केल्याने ते बचावले.
 
 
एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये "जर सरकारने ही योजना रद्द केली नाही तर ते सैन्यात सामील होण्याऐवजी दहशतवादी बनतील". असे म्हणतात. एक सहकारी आंदोलक म्हणतो, "अगर सरकार कानून वापिस नहीं लेगी तो मजबुरी मे हम आतंकवादी बन जाऐगे." 
 
 
अग्निपथ योजनेच्या विरोधी आंदोलकांनी विविध स्थानकांवर अनेक गाड्या जाळल्या, परिणामी देशभरातील मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द करण्यात आल्या. उत्तर प्रदेशातील बलिया, बिहारमधील समस्तीपूर आणि आरा आणि तेलंगणातील सिकंदराबाद येथील रेल्वे स्थानकांवर दंगलखोर ‘तरुणांनी’ हल्ला केला आणि गाड्या जाळल्या. सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर ईस्ट कोस्ट एक्सप्रेसवर हल्ला करण्यात आला आणि तिचे डबे जाळण्यात आले. तसेच समस्तीपूरमध्ये जम्मू तवी-गुवाहाटीचे अनेक डबे जाळण्यात आले. आजूबाजूच्या परिसरात पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले, ज्यामुळे हिंसाचारामुळे आधीच घाबरलेल्या लोकांचे, विशेषतः लहान मुलांचे जीवन धोक्यात आले.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0