'जेलर' चा फर्स्ट लुक रिलीज

    दिनांक  18-Jun-2022 17:21:25
|

rajnikanth
मुंबई : सुपरस्टार रजनीकांत या आगामी चित्रपट 'जेलर' ची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. रजनीकांतचा हा १६९वा चित्रपट असून प्रथमच ते दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांच्याबरोबर चित्रपट करत आहेत. शिवाय नेल्सन यांची ही स्वतःचे कथानक आहे. 'जेलर' चित्रपटाच्या निर्मात्यांनी शुक्रावारी या चित्रपटाच्या पोस्टरचा फर्स्ट लुक प्रदर्शित केला .
 
 
 
 
 
 
चित्रपटाच्या पोस्टरमुळे नेटकाऱ्यांमध्ये अतिशय उत्सुकता निर्माण झाली आहे , त्यांनी ह्या पोस्टरवर प्रतिक्रियांचा वर्षाव केला केला आहे. हा एक अॅक्शन ड्रामा आहे हे पोस्टर वरून लक्षात येत आहे. बीस्टची भूमिका साकारणाऱ्या विजयच्या चित्रपटाचे चित्रीकरण एकाच ठिकाणी झाले असल्यामुळे नेटकाऱ्यांनी नेल्सन दिलीपकुमार यांना विचारले की हा चित्रपट त्याच्या मागील बीस्ट प्रमाणे एकाच ठिकाणी शूट केला जाईल का? शिवाय एका नेटकाऱ्याने विचारले आहे, एकाच ठिकाणी रजनीकांत सारखा हाताळण्याचे सर्वात मोठे काम तू करत आहे; तर आणखी एक नेटकरी म्हणतो, जेलरला हाताळण्यासाठी एक मजबूत खलनायक देखील असू द्या. 'बीस्ट'ने बॉक्स ऑफिस वर चांगलीच कमाई केली असल्यामुळे 'जेलर' ने चाहत्यांच्या अपेक्षा अधिकच वाढवल्या आहेत.
 
 
 
 
 
 
या चित्रपटाला संगीत अनिरुद्ध रविचंदर देणार आहेत. तर चित्रपटात कोण कलाकार असणार आहेत, त्याचे कथानक काय आहे हे सर्वच तपशील अजून गुलदस्त्यात आहे. परंतु, ऐश्वर्या राय बच्चन, शिवकार्तिकेयन, प्रियंका अरुल मोहन, रम्या कृष्णन आणि योगी बाबू हे महत्त्वाच्या भूमिकांसाठी चर्चेत असल्याचे म्हटले जात आहे. कन्नड सुपरस्टार शिवराजकुमार यांनीही खुलासा केला आहे की तो या चित्रपटावर काम करत आहे आणि रजनीकांतसोबतच्या त्याच्या भागांचे चित्रीकरण बेंगळुरू किंवा म्हैसूरमध्ये होणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.