शक्तिमान आता मालिकेतून नव्हे तर चित्रपटातून येणार भेटीस

17 Jun 2022 13:32:16

shaktiman
 
 
 
 
मुंबई : 'शक्तिमान' या मालिकेने ९०च्या दशकात तुफान लोकप्रियता मिळवली होती. या सुपरहिरोच्या शो मधून मुकेश खन्ना यांनी लहान मुलांचे मनोरंजन केले. गेल्या काही दिवसांपासून आता 'शक्तिमान'चा देखील सिझन २ येणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र स्वतः मुकेश खन्ना यांनी या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे.
 
 
 
 
 
मुकेश खन्ना यांनी एका प्रसिद्ध वेबसाईटशी संवाद साधत असताना सांगितले की, 'हा प्रोजेक्ट माझ्याकडे बऱ्याच वर्षांनी आला आहे. अनेक जण 'शक्तिमान'चा सीझन २ बनवा, अशी मागणी करत होते. परंतु, आता शक्तिमान मालिकेतून नाही तर चित्रपटातून दाखवावा असा माझा हेतू आहे.' एवढेच नाही तर मुकेश खन्ना सांगतात, या चित्रपटाचा करार मी सोनीसोबत केला आहे आणि या चित्रपटासाठी लागणारा अंदाजे खर्च हा ३०० कोटी रुपये एवढा आहे, त्यामुळे सगळे ठरल्या शिवाय नक्की काही सांगणे शक्य नाही.
 
 
 
 
 
 
याच जोडीने मुकेश खन्ना सांगतात, 'शक्तिमान'चे चित्रपटात रुपांतर करणे ही खन्ना यांची इच्छा आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी स्वतः चित्रपटाची कथा तयार करत आहे. शिवाय ह्या कथेत बदल होणार नाही अशी त्यांनी अटच घातली आहे. याचबरोबर 'शक्तिमान'ची भूमिका कोण साकारणार यावर मुकेश खन्ना यांनी उत्तर दिले,' आणखी कोणी शक्तिमान झाले तर प्रेक्षक त्याचा स्वीकार करू शकतील का?' म्हणजे आता स्वतः मुकेश खन्नाच या चित्रपटात प्रेक्षकांना शक्तिमानच्या भूमिकेतून पुन्हा एकदा भेटीस येत आहेत.
Powered By Sangraha 9.0