कार्तिकवर होतोय कौतुकाचा वर्षाव

17 Jun 2022 15:24:43

aryn
 
 
 
 
मुंबई : कार्तिक आर्यनच्या अनेक चित्रपटांत 'भूल भुलैया २'ची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने जगभरात पसंती मिळवली आहे. एवढेच नाही 'भूल भुलैया २'ने बॉक्स ऑफिसवर देखील तुफान कमाई केली आहे. त्यामुळे त्याच्या वाढत जाणाऱ्या कलेक्शनबरोबरच सोशल मिडीयावरसुद्धा आर्यनची फॅन फॉलोइंग वाढत आहे. आणि आता कार्तिक लहान मुलांचाही आवडता झाला आहे. लहान मुलांबरोबर तो धम्माल करतानाचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.
 
 
 
 
 
कार्तिक आर्यन सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. नुकत्याच त्याच्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये तो काही लहान मुलांबरोबर आपल्या चित्रपटाचा आनंद घेताना दिसून येत आहे. कार्तिकने 'क्राय फाऊंडेशन'च्या मुलांसाठी आपल्या 'भूल भुलैया २' या चित्रपटाचे खास स्क्रीनिंग आयोजित केले होते. त्याचदरम्यान कार्तिकने एनजीओमधल्या छोट्या चाहत्यांची भेट घेतली, एवढेच नाही तर चित्रपटानंतर त्यांच्याशी गप्पा मारल्या, धम्माल केली.
 
 
View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

 
 
 
कार्तिक आर्यनने त्याच्या सोशल मिडीयावर एका लहान मुलीबरोबर गप्पा मारत असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये त्याची ही चिमुकली चाहती सांगते आहे की, तिला या चित्रपटात कार्तिक किती आवडला आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत त्या दोघांचे खूप कौतुक केले आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक आपल्या स्टाफबरोबर आणि पेट डॉगबरोबर आहे.
 
Powered By Sangraha 9.0