"माझ्या मतदानाचा अधिकार राऊतांनाच द्या, नाहीतर पराभवाचं खापर पुन्हा अपक्षांवरच फुटेल"

17 Jun 2022 14:53:39

Devendra Bhuyar Sanjay Raut
 
 
 
मुंबई : "मी मतदान करेन त्यावेळी मला संजय राऊतांना सोबत नेऊ द्यावं. नाहीतर या निवडणुकीत ठाकरे सरकारच्या एखाद्या उमेदवाराचा पराभव झाल्यास ते पुन्हा आमच्यावरच खापर फोडतील.", असे म्हणत शुक्रवारी (दि. १७ जून) अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 'माझ्या मतदानाचा अधिकारही त्यांनाच देऊन टाका, म्हणजे त्यांना शंका घ्यायला कारणच उरणार नाही.', असेही ते पुढे म्हणाले.
 
 
 
राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत यांनी थेट अपक्षातील काही आमदारांची नावं घेत शिवसेना आमदाराच्या पराभवाचे खापर फोडण्याचा प्रयत्न केला होता. घेतलेल्या नावांपैकी एक नाव आ. देवेंद्र भूयार यांचे होते. 'घोडेबाजारात विकले गेलेल्या आमदारांनी आम्हाला मतदान केलेलं नाही', असे राऊत त्यावेळी म्हणाले होते. त्यानंतर भुयारांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली होती.
 
 
 
शंका घेण्याचं कारणच नाही
"मी महाविकास आघाडीसोबत संजय राऊत यायच्या आधीपासून आहे. ते विधानसभेला आघाडीसोबत आले, मी लोकसभेपासून आहे. त्यामुळे माझ्यावर शंका घेण्याचं कारणच नाही. विधान परिषद निवडणुकी दरम्यान पुन्हा जर आघाडी सरकारमधला एखादा उमेदवार पराभूत झाला तर राऊतांवर पुन्हा आमच्यावर खापर फोडण्याची वेळ येऊ नये म्हणून मी मतदान करेन त्यावेळी मला संजय राऊतांना सोबत नेऊ द्यावं.", असे देवेंद्र भुयार यांचे म्हणणे आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0