अभिनेता करणवीर बोहरा विरोधात गुन्हा दाखल

15 Jun 2022 17:08:10

karnvir
 
 
 
 
 
 
 
मुंबई : हिंदी मालिकांमधून घराघरात पोहचलेला अभिनेता करणवीर बोहरा बद्दल नुकतीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एक ४० वर्षीय महिलेने करण आणि त्याची पत्नी तजविंदर सिद्धू अर्थातच टीजेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
 
 
 
 
 
२.५% व्याजावर पैसे परत करू, असे आश्वासन देऊन देखील ते परतविले नाहीत, असे सांगत या महिलेने करणवीर सह तब्बल सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या सेलिब्रिटी जोडप्याने फक्त एक कोटी रुपयेच परत केले आहेत. शिवाय आपण जेव्हा ह्या दोघांकडे उर्वरित रकमेची मागणी केली तेव्हा गोळ्या घालण्याची धमकी तिला दिली, अशी तक्रार या महिलेने ओशिवरा पोलिस ठाण्यात केल्याची माहिती, ओशिवरा पोलिसांनी दिली.
 
 
 
 
 
 
गेल्या काही वर्षात करणवीर नच बलिये ४ , झलक दिखला जा ६ , खतरों के खिलाडी , बिग बॉस तसेच 'लॉक अप' नावाच्या रिअॅलिटी शोमध्ये दिसला होता. लॉकअप चे शूट सुरु असतानाच, आपण कर्जबाजारी झालो आहोत आणि आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय समोर दिसत नाही, असे करणवीरने म्हटले होते. तसेच कर्ज परत करण्याइतपत देखील आता पैसे शिल्लक नाहीत, आर्थिक संकटाचा मी सामना करत आहे आणि त्यातच फसवणुकीचे आरोप माझ्यावर होत आहेत, गुन्हे दाखल केले जात असल्याचेही करणवीरने म्हटले होते. तसेच जर माझ्यामागे माझे कुटुंब नसते तर मी आत्महत्या केली असती, असे करणवीरने सांगितले होते.
Powered By Sangraha 9.0