दिल्ली न्यायालयाने दिली लॉरेन्स बिश्नोईला अटक करायची परवानगी

15 Jun 2022 12:42:10
 
 
lawrence bishnoi
 
 
 
 
 
नवी दिल्ली: पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला अटक करण्यात आली आहे. मानसाच्या मुख्य न्यायदंडाधिकार्यासमोर बिश्नोईला हजर करण्यासाठी, दिल्ली न्यायालयाने ट्रान्झिट रिमांडला मंजुरी दिली आहे. पंजाबचे न्यायाधीश जनरल अनमोल रतन सिद्धू यांनी एक अर्ज दाखल केला. या अर्जात पंजाब पोलिसांना बिश्नोईला औपचारिकपणे अटक करण्याची परवानगी देण्यात आली.
 
 
 
कडक सुरक्षा तैनात
 
 
न्यायालयाने पोलिसांना बिश्नोई याला पंजाबला घेऊन जाण्याची परवानगी दिली. जाताना, कडक सुरक्षा तैनात करण्यात आली. सुरक्षेसाठी ५४ सुरक्षा अधिकारी, ३८ सशस्त्र पोलिस कर्मचार्‍यांसह दोन बुलेटप्रूफ कार आणि १० वाहने होती. बिश्नोईचे वकील विशाल चोप्रा यांनी बिश्नोईला पंजाबला घेऊन जाण्याच्या याचिकेला विरोध केला होता. बिश्नोईला पंजाब पोलिसांच्या 'बनावटी चकमकीत' जीवे मारण्याची धमकी असल्याचे वकील विशाल चोप्रा यांनी सांगितले. बिश्नोईची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, असे निर्देशही न्यायालयाने पंजाब पोलिसांना दिले.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0