जम्मू-काश्मीरमध्ये चकमक: रजनी बाला यांचे मारेकरी सापळ्यात!

15 Jun 2022 17:19:24
jk
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या सापळ्यात काही दहशतवादी सापडले आहेत. या दहशतवाद्यांनी शाळेतील शिक्षिका रजनी बाला यांची हत्या केली होती. रजनी बाला या गोपालपोरा भागातील एका हायस्कूलमध्ये काम करणाऱ्या शाळेतील शिक्षिका होत्या. इस्लामिक दहशतवाद्यांनी दि. ३१ मे रोजी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानच्या कांज्युलर भागात बुधवारी दि. १५ रोजी पहाटे दोन लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवादी चकमकीत ठार झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव शोपियानचे जान मोहम्मद लोन असे आहे. कुलगाम जिल्ह्यात दि. २ जून रोजी विजय कुमार या बँक व्यवस्थापकाच्या हत्येमध्ये जान मोहम्मद लोनचा हात होता. बुधवारी मध्यरात्री १२.५० वाजता चकमक सुरू झाली. हे जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलांनी संयुक्तपणे आयोजित केले होते.

याआधी सोमवारी श्रीनगरच्या बेमिना भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. हे दहशतवादी लष्कर-ए-तैयबा  या दहशतवादी संघटनेशीही संबंधित होते. या भांडणात एक पोलीस कर्मचारीही किरकोळ जखमी झाला. इस्लामिक दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये अनेक नागरिकांना ठार मारले आहे. अलीकडच्या काही महिन्यांत खोऱ्यात पीएम पॅकेज अंतर्गत भरती झालेल्यांसह अनेक काश्मिरी हिंदूंवर दहशतवाद्यांनी हल्ले केले आहेत. काश्मिरी हिंदूंना खोऱ्यातून बाहेर काढण्याची धमकी देऊन त्यांच्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे.
Powered By Sangraha 9.0