बंगालमध्ये लोकल ट्रेनवर झाली दगडफेक, अनेक जण जखमी

13 Jun 2022 14:33:00
 

local train 
 
 
 
कोलकाता: प्रेषित मुहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रविवारी संध्याकाळी पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील बेथुआदहरी रेल्वे स्थानकावर जमावाने लोकल ट्रेनवर हल्ला केला. हावडा आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून हिंसाचा सुरु आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबरावर केलेल्या टिप्पण्यांचा निषेध करण्यासाठी धुबुलिया रेल्वे स्टेशनची तोडफोड करण्यात आली.
 
 
स्टेशनवरील काही कर्मचारी आणि कृष्णानगर-लालगोला लोकल ट्रेनमधील प्रवासी जखमी झाले आहेत. पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यात, पोलिसांनी राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते , भाजपचे सुवेंदू अधिकारी यांना, कलम १४४ अंतर्गत "सावधगिरीचा उपाय म्हणून" हावडा येथील हिंसाचारग्रस्त भागात जाण्यापासून रोखले. जिल्ह्यातील अनेक भागात त्यांच्या भेटीमुळे तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा पोलिसांनी केला आहे.
 
 
अधिकारी यांना हावडा येथे जाण्याची परवानगी नसल्याबद्दल राज्यपाल जगदीप धनखर यांनी मुख्य सचिव एच के द्विवेदी यांच्याकडून अद्यतने मागितली. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बेथुआदहरीमध्ये १,००० हून अधिक निदर्शकांनी दगडफेक केली, घरांचे नुकसान केले आणि तेथील रस्त्यांवर नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग केला असता, त्यांचा काही भाग बेथुआदहरी रेल्वे स्थानकाच्या आत गेला आणि तेथील फलाटावर असलेल्या ट्रेनवर हल्ला केला.
 
 
या घटनेमुळे या मार्गावरील रेल्वे सेवा सुमारे दोन तास विस्कळीत झाली होती. संध्याकाळी ६च्या सुमारास घडलेल्या या घटनेसंदर्भात दहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0