तब्बल 'या' किमतीला विकले गेले आयपीएलचे प्रसारण हक्क

13 Jun 2022 18:52:01

IPL
 
 
 
 
 
नवी दिल्ली : आयपीएल प्रसारण हक्क विकत घेण्यासाठी देशातील काही प्रमुख क्रीडा प्रसारकांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु झाली होती. आयपीएलच्या २०२३ ते २०२७ या पुढील पाच हंगामासाठी आयपीएल प्रसारण हक्कांसाठीची लिलाव प्रक्रिया सोमवार दि. १३ जून रोजी पार पडली. भारतीय उपखंडासाठी ४३ हजार कोटींमध्ये टीव्ही आणि डिजिटल हक्क विकण्यासाठी हा व्यवहार करण्यात आला होता.
 
 
महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या कंपनीने हे आयपीएल प्रसारण हक्क विकत घेतले, त्या कंपनीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. याव्यतिरिक्त महत्वाचे म्हणजे ज्या आयपीएल कंपनीला आयपीएलचे प्रसारण हक्क प्राप्त होतात, त्यांच्याच टीव्ही किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आयपीएलचे सामने दाखविले जातात. यासाठी बीसीसीआयने आयपीएलच्या पुढील पाच वर्षांच्या प्रसारणासाठी रविवार दि. १२ जून पासूनच लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली होती.
 
 
या लिलावात अनेक मोठ्या नामांकित कंपन्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. आयपीएल प्रसारण हक्कांसाठी डिज्नी स्टार, सोनी नेटवर्क आणि रिलायन्स व्हायकॉम१८ आणि झी यांच्यासारख्या अनेक नामांकित कंपन्यांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली. परंतु या सगळ्या कंपन्यांपैकी नेमक्या कोणत्या कंपनीने आयपीएल प्रसारण हक्क प्राप्त केलेले आहेत, त्या कंपनीचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0