अपक्षांवर अविश्वास दाखवणे योग्य नाही : एकनाथ खडसे

13 Jun 2022 18:56:15

sr
 
मुंबई : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला आहे, याच खापर शिवसेना नेते संजय राऊत अपक्ष आमदारांवर फोडत आहेत. डोंबिवलीतील खोणी पलावा येथे रविवारी एकनाथ खडसे त्यांच्या आप्तेष्टांच्या घरी आले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने खडसे यांना उमेदवारी दिली आहे.
 
यावेळेस पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, "मतदारांवर विश्वास दाखवावा लागतो. मत दिलं की नाही हा अंदाज असू शकतो, मात्र निश्चित स्वरूपात सांगणे योग्य नाही. आमदारांवर सोपवलेली जबाबदारी निश्चितच पूर्ण केलेली आहे. मी प्रतोद अनिल पाटील यांच्याशी चर्चा केली. ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी हजर होते. त्यांनी मला सांगितलं तिघांनी मतदान केल, याची मला खात्री आहे, विश्वास असल्याचे देखील ते म्हणाले."
 
 
अपक्षांवर अशा प्रकारे अविश्वास दाखवणे योग्य नाही असा मोलाचा सल्ला राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिला.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0