रणवीर समोर आला 'बिकट' प्रसंग!

11 Jun 2022 18:57:36

bear
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध मालिका वाईल्ड विथ बेयर ग्रिल्स नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित करते. याचे एक विशेष कारण म्हणजे बेयर आपल्या शोमध्ये जगभरातील प्रसिद्ध सेलिब्रेटींना सहभागी करून घेतो. आपल्या देशातील सेलिब्रेटींबाबत बोलायचे झाल्यास बॉलीवूड मधील अक्षय कुमार, दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत एवढेच नाही तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्याच्याबरोबर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
 
 
 
 
 
पुन्हा एकदा या कार्यक्रमाची चर्चा सुरु झाली आहे. कारण आता यामध्ये सर्वांचा लाडका अभिनेता रणवीर सिंग बेयरसोबत जंगलसफारी करताना दिसणार आहे. या दरम्यान रणवीर ला एका बिकट प्रसंगाला सामोरे जावे लागले होते, त्यावेळी रणवीर 'माझा जीव वाचव' म्हणून बेयरला चक्क विनंती केली होती. चर्चेत राहण्यासाठी रणवीर नेहमीच काहीना काही करामती करत असतो.
 
 
 
 
 
 
नेटफ्लिक्सनंतर आता इंस्टावरुन रणवीर व्हर्सेस वाईल्ड नावाच्या कार्यक्रमाचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये रणवीर समोर आलेल्या अस्वलामुळे प्रेक्षकांचे डोळे विस्फारले आहेत. रणवीर चक्क अस्वलासमोर अडकला आहे. आणि सुटकेसाठी त्याने बेयरला हाक मारली. त्यांच्या त्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे.
Powered By Sangraha 9.0