गेम प्लॅनमध्ये आम्ही अपयशी, जास्तीचं मत कुणाचं? शोध घेतोयं : नाना पटोले

11 Jun 2022 17:12:09

nana patole 2
 
 
 
 
मुंबई : "माविआकडे १७२ मतं असताना आमचा उमेदवार पराभूत झाला, गेम प्लॅन मध्ये आम्ही अपयशी ठरलो", अशी प्रतिक्रिया राज्यसभेच्या निकालावर नाना पाटोले यांनी दिली. "राज्यसभा निवडणुकीमध्ये आम्हाला एक मत जास्त मिळाले, ते कुणाचे मिळाले याचा शोध घेतोय", अशी प्रतिक्रीया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
 
 
 
"जे काही झाले ते सगळ्यांच्या समोर घडले, त्या निकालावर काही करता येणार नाही, आता ज्या पद्धतीने भाजपाने जो गेम प्लॅन केला, त्यावर कशा प्रकारे विजय प्राप्त करता येईल त्याचे सगळे प्लँनिंग महाविकास आघाडी करेल", असे देखील नाना पाटोले शेवटी म्हणाले.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0