मुंबई : राज्यसभा निवडणूक सहाव्या जागेसाठी प्रतिष्ठेची बनल्यानंतर ठाकरे सरकारचे आघाडीचे मंत्री आणि आमदार नाराज दिसत होते. बच्चू कडूही याला अपवाद नव्हते. मात्र, राज्यसभा निवडणूकीसाठी मतदान केल्यावर आपली नाराजी दूर झाली असून ती फक्त शेतकऱ्यांसाठी होती, असा दावा मंत्री बच्चू कडू यांनी केला. ठाकरे सरकारचाच या निवडणूकीत विजय होईल, असा दावाही त्यांनी केला. माझी व्यक्तीगत नाराजी ही आयुष्यात नव्हती आणि असणारी नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाट मोकळी करुन देण्यासाठी मी विषय मांडला, असेही कडू म्हणाले.