लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी जपले 'प्रथम राष्ट्र....'हे भाजपचे ब्रीद

10 Jun 2022 15:44:17
 
vt
 
 
 
पुणे: येथील चिंचवड मतदार संघाचे लक्ष्मण जगताप,आणि कसबा पेठच्या मुक्ता टिळक या दोन भाजप आमदारांनी आज राज्यसभा निवडणुकी साठी दुर्धर आजाराने ग्रस्त असताना देखील मतदानास हजेरी लावल्याने सोशल मीडियावर या दोघांवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 
 
भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्यांसाठी जो मूलमंत्र आहे ' प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः ' याचा अमल प्रत्यक्षात कृतीतून सिद्ध केल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव देखील केला जात आहे, राष्ट्र प्रेम जागवित मतदानाचा विपरीत परिस्थितीत हक्क बजावणाऱ्या या दोन्ही आमदारांची प्रकृती लवकर बरी होवो आणि ते पुन्हा जन सेवेत रुजू होवोत अशा सदिच्छा या आमदारांना समाज माध्यमांवर दिल्या जात आहेत.
 
 
आज दोघेही रुग्णवाहिकेतून मुंबई विधान भवन परिसरात दाखल होताच टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.
' पक्षाला आज माझी गरज आहे, त्यामुळे मी मतदानाला जाणारच ' असे लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.
 
 
प्रकृती ठीक असेल तरच मतदानाला या: देवेंद्रजिं निरोप
  
 
लक्ष्मण जगताप यांनी मतदानाला जाण्याचा आग्रह धरल्याचे माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी चिंचवड येथे आमदारांना मुंबईला घेऊन जाताना सांगितले. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांची प्रकृती ठीक असेल तरच मतदानाला या असे सांगितले होते असेही ते म्हणाले,मात्र पक्षाला आज माझी गरज असल्याचे सांगून आमदार लक्ष्मण जगताप यांनी मतदानाला जाण्याचा आग्रह धरला असे त्यांनी स्पष्ट केले. आधी एअर अँब्युलन्स ने नेण्याचे ठरले होते मात्र डॉक्टरांनी हवामान बदल लक्षात घेऊन बाय रोड जाण्याचा सल्ला दिला.
 
 
एकंदरीतच राज्यसभेच्या महाराष्ट्रातील निवडणुकीच्या इतिहासात आता या दोन आमदारांचे नाव राष्ट्रप्रेमी आमदार म्हणून कोरले जाईल अशी भावना पुण्यात आणि पिंपरी चिंचवड परिसरात व्यक्त होत आहे. अनेकांनी या आमदारांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना आणि सदिच्छा देखील दिली आहे.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0