अरुण योगिराज साकरणार नेताजींचा भव्य दिव्य पुतळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2022
Total Views |

yogiraj
 
 
 
 
मुंबई : म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज 'नेताजी सुभाषचंद्र बोस' यांचा ३० फूट उंच पुतळा तयार करणार आहेत. नेताजींचा हा पुतळा इंडिया गेट येथे अमर जवान ज्योतीच्या मागे भव्य छत्राखाली बसवला जाईल. योगीराज यांनी केदारनाथमध्ये आदि शंकराचार्यांची १२ फूट उंच पुतळाही तयार केला होता, ज्याचे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते.
 
 
 
पुतळ्यासाठी मोठ्या काळ्या 'जेड ग्रॅनाइट'चा दगड निवडण्यात आला आहे. कोरीव काम पूर्ण होण्यापूर्वी हा दगड दिल्लीला नेण्यात येईल. या पुतळ्याची रचना 'नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट' (एनजीएमए) च्या एका टीमने केली आहे. या टीमचे प्रमुख सांस्कृतिक मंत्रालयाचे महासंचालक अद्वैत गडानायक आहेत. एप्रिलमध्ये योगीराज यांनी पीएम मोदींची भेट घेतली. आणि त्यांना बोसचा दोन फुटांचा पुतळा भेट दिला. या भेटीचा फोटो ट्विट करताना पंतप्रधानांनी नेताजी बोस यांचा असाधारण पुतळा शेअर केल्याबद्दल योगीराजांचे आभार मानले.
 
 
 
प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचा मुलगा, अरुण योगीराज ३७ वर्षांचा आहे. अरुणच्या वडिलांनी गायत्री आणि भुवनेश्वरी मंदिरांसाठीही काम केले आहे. 'एमबी'एपर्यंतचे शिक्षण घेतलेले योगीराज हे पाचव्या पिढीतील शिल्पकार आहेत. एमबीएची पदवी घेतल्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरीही केली. पण २००८ मध्ये त्यांनी शिल्पकार होण्यासाठी नोकरी सोडली. केदारनाथ येथे स्थापित आदि शंकराचार्यांचा पुतळा बांधण्याव्यतिरिक्त, योगीराज यांनी म्हैसूरमध्ये महाराजा जयचमराजेंद्र वडेयर, महाराजा श्री कृष्णराजा वाडियार-चतुर्थ आणि स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा १४.५ फूट पांढरा संगमरवरी पुतळाही बांधला आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@