नरेंद्र मोदींच्या उपस्थितित देहू येथील सोहळा भव्य होणार : हर्षवर्धन पाटील

    01-Jun-2022
Total Views |

HP
 
 
 
 
 
पुणे : संत तुकाराम महाराजांच्या देहू येथील शिळा मंदिर लोकार्पण सोहळा भव्य स्वरुपात होणार असल्याची माहिती भाजप नेते आणि राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज दिली. येत्या १४ जून रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या लोकार्पण सोहळ्यासाठी येणार आहेत, 'न भूतो, न भविष्यती' असा हा सोहळा असेल आणि त्याचे नियोजन केले जात आहे असेही पाटील म्हणाले.
 
 
 
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी सोहळा यशस्वी पार पाडण्याची जबाबदारी हर्षवर्धन पाटील यांच्यावर सोपवली असून आज त्याचसाठी ते देहू येथे आले होते. पाटील देहू येथे प्रत्यक्ष पाहणी केली तसेच देहू संस्थान, पोलीस आणि इतर विभागाचा आढावा घेतला. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेडगे, जिल्हाध्यक्ष गणेश भेडगे, देहू संस्थांचे विश्वस्त आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.