दाऊदचे हस्तक आणि मलिकांच्या निकटवर्तीयांविरोधात छापेमारी

09 May 2022 10:44:20
dawood
 
 
 
 
 
 
मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA )ने कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमशी निगडित मुंबईतील २० ठिकाणांवर सोमवारी छापासत्र सुरु केले आहे. मुंबई आणी उपनगरांतील भेंडीबाजार, बोरिवली, गोरेगाव, मुंब्रा, नागपाडा या ठिकाणांवर हे छापासत्र सुरु झाले आहे. या ठिकाणांवरून दाऊदचे हस्तक अंमली पदार्थांची तस्करी, दहशतवादी कारवाया यांसारखी कामे करत असल्याची माहिती तपास यंत्रणांकडे आहे.
 
 
 
दाऊद इब्राहिमने छोटा शकील, इकबाल मिर्ची यांसारख्या गुंडांना हाताशी धरून आपले नेटवर्क तयार केले होते. हे तेच प्रकरण आहे ज्या प्रकरणामध्ये राज्याचे माजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात फेब्रुवारी महिन्यातच गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आत पर्यंत सलीम फ्रुट, माहीम दर्ग्याचे सुहेल खंडवानी, बाबा फालुदा या सर्व व्यक्तींना राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0