Cyclone Asani Updates : 'असनी'ची तीव्रता वाढणार

09 May 2022 12:22:05
cyclone
 
 'असनी' हे श्रीलंकेने दिलेले नाव असून त्याचा अर्थ सिंहलीमध्ये 'क्रोध' असा होतो
 
 
मुंबई: दक्षिणपूर्व आणि पश्चिममध्य बंगालच्या उपसागरावरील तीव्र चक्रीवादळ 'असनी' 10 मे पर्यंत वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीपासून पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरात 'असनी' पोहोचेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
 
कार निकोबार (निकोबार द्वीपसमूह) च्या वायव्येस 610 किमी अंतरावर दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरावर रविवारी दि. ८ रोजी संध्याकाळी ५  वाजता असनी तीव्र चक्री वादळात तीव्र झाले. या तीव्र चक्रीवादळामुळे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. उद्या दि १० मे संध्याकाळपासून उत्तर किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशच्या लगतच्या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
बुधवार, दि. ११ मे रोजी किनारपट्टीवरील ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी दि. १२ रोजी, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
 
"पुढील ५ दिवसात ईशान्य भारतात गडगडाटी वादळ/विजांच्या कडकडाटासह हलका/मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. १०-१२ तारखेदरम्यान अरुणाचल प्रदेशात आणि 09 तारखेदरम्यान आसाम-मेघालय आणि मिझोराम-त्रिपुरामध्ये विलग मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने ईशान्य भारतासाठी दिलेल्या पावसाच्या इशाऱ्या मध्ये म्हटले आहे.
 
 
हे चक्रीवादळ सध्या १२० किमी प्रतितास वेगाने पूर्व किनार्‍याकडे सरकत आहे. ओडिशा सरकारने सोमवारी दि. ९ रोजी चार किनारी जिल्ह्यांतील लोकांचे स्थलांतर करण्याचे नियोजन केले आहे. 
 
 
Powered By Sangraha 9.0