मला रोज बोललेच पाहिजे, नाहीतर आमचा अजेंडा सेट होणार नाही

08 May 2022 16:17:38
 
 
 
 
raut 
 
 
 
 
मुंबई: आपल्याकडे विरोधकांना बदनाम करण्याची सुरुवात झाली ती हिटलरनीती आहे. विरोधक आपल्याला बदनाम करायला लागले, पण आपण नैतिकता सांभाळत बसलो, पण तुम्ही जर नैतिकता सांभाळत नसाल तर मला कोथळा काढण्याचा अधिकार आहे अशी मुक्ताफळं राऊतांनी उधळली आहेत. शिवसैनिकांना सोशल मीडिया सेलचा मेळावा आयोजित केल्याठिकाणी ते बोलले आहेत.
 
 
 
हिटलर सगळ्यांना प्रिय होता, बाळासाहेबांना देखील आवडायचा. आता पंतप्रधानांनाही हिटलर आवडतो. मोदी हिटलरला फॉलो करतात, असं संजय राऊत म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशातल्या निवडणुकी आधी मुस्लिम हिजाब प्रकरणावर सोशल मीडियाचा वापर केला गेला. सैन्य पोटावर चालतं, पण आमची एक पिढी वडापाववर लढत होती. आपण भाजपकडून ही सत्ता खेचून आणली आहे. माझ्यासारखे हजारो लोक तयार झाले पाहिजे. मी रोज सकाळी बोलतो पण माझा नाईलाज आहे. नाहीतर पक्षाचा दिवसभर अजेंडा सेट होणार नाही, अशी अगतिकता राऊतांनी व्यक्त केली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0