‘लव्ह जिहाद’ आणि धर्मो रक्षति रक्षितः!

07 May 2022 20:30:25

love jihad1
 
 
 
‘जसे कावीळ झालेल्यांना सगळं पिवळं दिसतं, तसं या लोकांच झालं आहे. प्रेमामध्ये पण यांना ‘जिहाद’ दिसतो. म्हणे ‘लव्ह जिहाद’ हॅ... किंवा प्रेम काय जात-धर्म बघून होतं का? धर्मबिर्म सगळं ढोंग आहे, बेकार लोकांच्या उचापत्या!! त्याला कशाला यामध्ये ओढता? प्रेम करणाऱ्यांना जगू द्या, तुम्ही ना जुन्या चालीरीतीची लोकं...’ तर असे म्हणणार्‍या आणि मानणाऱ्या लोकांसाठी खास आजचा लेखप्रपंच. ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना कशा थांबणार? कुटुंबाची, समाजाची भूमिका काय?
 
 
 
२०१३ साली पटनामध्ये मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट झाला. त्या गुन्ह्यासाठी आयशा नावाची महिला तुरूंगात आहे. तिचे मूळ हिंदू. तिचे नाव होते आशा. पण, झुबेरशी तिचा विवाह झाला. धर्मांतर करून ती आयेशा झाली. त्यांना तीन मुलंही आहेत, तर या आयेशाला सजा का झाली तर? तिच्या नावावर ३५ बँकेची खाती होती. पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधून दहशतवाद्यांनी त्या खात्यांमध्ये करोडो रुपये जमा केले. बॉम्बस्फोट घडवला गेला. आयेशाचे म्हणणे तिला माहितीही नाही की, तिच्या नावावर अशी काही खाती आहेत. या बॉम्बस्फोट संदर्भात तिचा पती झुबेरही संबंधित आहे. आशा ही तुरूंगात दहशतवादी म्हणून शिक्षा भोगतेय. ‘लव्ह जिहाद’ का केला जातो? त्यासंदर्भात थोडेसे उत्तर देणारे हे एक उदाहरण.या पार्श्वभूमीच्या काही खास लोकांचे म्हणणे असते की, ‘लव्ह जिहाद’ तर रा. स्व. संघ, विश्व हिंदू परिषदेने तसेच हिंदुत्ववादी संघटना आणि व्यक्तीने तयार केलेला बागुलबुवा आहे. तर मुळात ‘लव्ह जिहाद’ असतो हे पहिल्यांदा सांगणारे आणि अगदी कायदेशीर लढाई लढणारे रा. स्व. संघ, विश्व हिंदू परिषद किंवा हिंदुत्ववादी व्यक्ती, संघटना नव्हती, तर काही मुस्लीम युवक हिंदू आणि ख्रिश्चन युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतरण करतात. तेच त्यांचे काम आहे, असे स्पष्ट करणारा दावा पहिल्यांदा २००९ साली मांडला तो लंडनचे तत्कालीन पोलीस आयुक्त सर इयान ब्लेयर यांनी. पुढे २००९ मध्ये केरळमध्ये पोलीस महानिदेशक जेकब पुन्नोज यांनी एक अहवाल तयार केला. त्यामध्ये म्हटले होते की, गैर मुस्लीम मुलींना धर्मांतरित करून त्यांना मुस्लीम बनवण्यासाठीच काही संघटनेचे सदस्य काम करतात. त्यावेळी न्यायमूर्ती केटी शंकरन् यांनी पुन्नोज यांचा अहवालही स्वीकारला होता. इतकेच नव्हे, तर कम्युनिस्ट नेता व्ही. एस. अच्युतानंद यांनी २०१० साली पहिल्यांदा राजनैतिक आणि सामाजिक स्तरावर ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा उपस्थित केला हेाता. नुकतेच केरळचे लोकप्रिय पादरी पाला बिशप जोसेफ कल्लारंगट तर त्यापुढे जाऊन म्हणाले की, “जिहादी दहशतवादी केवळ ‘लव’चा सहारा घेऊनच नव्हे, तर इतर धर्मीयांना फसवण्यासाठी ते अमली पदार्थांचाही वापर करतात.”
 
 
 
यानुसार अ‍ॅड. सुधा जोशी यांनी हाताळलेले एक प्रकरण सांगणे क्रमप्राप्त आहे. एक हिंदू युवती होती. वडिलानंतर अनुकंपा तत्वावर ती त्यांच्या जागी रेल्वेत नोकरीला लागली. सर्व सुरळीत होते. पण, एक-दोन वर्षातच कोरोना आला. ‘लॉकडाऊन’ लागला. मुलीला ‘लॉकडाऊन’मुळे रजा मिळाली. याच काळात ती मित्र-मैत्रिणींना भेटू लागली. तिच्या मित्रपरिवारात एक सामायिक मित्र होता. त्याच्या आईचे ब्युटीपार्लर आणि वडील लंडनला राहायचे असे त्यांचे म्हणणे. या मुलाशी हिंदू युवतीची ओळख झाली. पुढे या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्या मुलाने सांगितले की, ”त्याचे एका हिंदू डॉक्टर मुलीवर प्रेम होते. पण, तिने धर्मावरून त्याला नकार दिला. त्यामुळे त्या दुःखात मी अमली पदार्थ घेतो. माझी खरी मैत्रीण म्हणून तूच मला या दुःखातून बाहेर काढू शकशील.” मुलीने तयारी दर्शवली. पण, पुढे या मुलीलाही अमली पदार्थाचे व्यसन लागले. मुलीच्या म्हणण्यानुसार या मुलानेच तिला अमली पदार्थाचे व्यसन लावले. याच काळात या युवतीने मुलासाठी स्वतःच्या खात्यातून १९ लाख रुपयांचे कर्ज घेतले. या मुलासाठी बँक हप्त्यातून दोन, चारचाकी वाहने आणि एक बाईक या मुलाच्या भावासाठी घेतली. तिचा पूर्ण पगार कर्जाच्या हप्त्यात जाऊ लागला. घरातल्यांना तिने सांगितले की, ‘लॉकडाऊन’मुळे पगार मिळत नाही. घरातल्यांना सत्य समजले. हे मुलाला कळताच त्याने त्या मुलीसोबत कल्याणच्या झोपडपट्टीत निकाह लावला. त्याचा व्हिडिओ तयार केला आणि मुलीच्या घरच्यांना पाठवला. तो त्या मुलीकडून हवे ते करून घेत होता. कारण, त्याने तिला अमली पदार्थाचे व्यसन लावले होते आणि ती पूर्णतः त्याच्या आहारी गेली होती. घरातल्यांनी मुलगी या जाळ्यातून सुटावी म्हणून खूप विचार केला. त्यांनी या मुलाला सांगितले की, ”ही मुलगी अनुकंपा तत्वावर नोकरी करते, तिच्या कामात आम्ही सांगू की, या मुलीने लग्न केले आणि ती तिच्या घरच्यांना पाहत नाही. तिची नोकरी सुटली तरी चालेल.” हा निरोप कळताच या मुलाने त्या युवतीला तिच्या परिसरात आणून सोडले. कारण, तिची नोकरी गेली,तर पगार मिळणार नाही, मग ती मुलगी काय कामाची, असा त्याने विचार केला. ती आली तेव्हा तिच्यावर नशेचा इतका अंमल होता की, ती नीट उभीदेखील राहू शकत नव्हती. पुढे कायदेशीर तक्रारी झाल्या. मुलीची फसवणूक, नशेचा व्यवहार, जबरन विवाह आणि धर्मांतर वगैरे हा मुद्दा होताच. मात्र, हा मुलगा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. तिचा विवाह आणि धर्मांतर नशेच्या अमलात झाले, हे न्यायालयात सिद्ध करायचे आहे. त्यानंतर त्या मुलाला सजा होणार!
 
 
 
ही घटना तर हिमनगाचे टोक. अशा शेकडो घटना आहेत. ज्यामध्ये लेकीसुनांना त्या केवळ हिंदू आहेत म्हणून प्रेमजाळ्यात अडकवले गेले. त्यांचे शोषण झाले. त्यांना भयंकर नरकयातना भोगाव्या लागल्या. त्यांचा बळी गेला. काही दिवसांपूर्वीच उघडकीस आलेली ग्वालियरची घटना तर भयंकरच! ज्यात हिंदू मुलीला एका मुस्लीम युवकाने आपणही हिंदू आहोत, असे खोटे सांगून फसवले. नंतर मुलाचा धर्म त्या मुलीला कळल्यावर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. तिला विवाह करण्यास भाग पाडले. विवाहानंतर धर्मांतर करण्यास ‘पाकसाफ’ व्हावे म्हणून ओसामा नावाच्या स्थानिक मौलवीने बलात्कार केला. दोन दिरांनी बलात्कार केला. सासूने या मुलीला जबददस्तीने वेश्या व्यवसायातही ढकलले. तिला कैदच करून ठेवले होते. हे सगळे कोणत्या प्रेमाच्या व्याख्येत बसते? इतकी क्रुरता प्रेमात आणि नात्यात असू शकते का? नुकतीच गोरेगावमध्ये सोनम शुक्लाची हत्या झाली. ‘नीट’ची परीक्षा देणारी सोनम बेकरी चालवणार्‍या मोहम्मद अन्सारीच्या प्रेमात कशी पडली असेल, हा मुद्दा गौण नाही, तर भांडणामध्ये मोहम्मदने सोनमचा गळा दाबून खून केला. हातपाय बांधून तिचा मृतदेह पोत्यात कोंबून वसोर्र्वा नदीनाल्यात फेकला. हे कोणते प्रेम? अर्थात, काही खर्‍या प्रेमाचीही उदाहरणं आहेत. ते प्रेम म्हणजे प्रेम असते, हे मान्यच आहे. मात्र, नियोजनबद्ध स्वतःची ओळख, धर्म सगळे सगळे बेमालूमपणे लपवत समोरच्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात अगदी पद्धतशीरपणे ओढणार्‍यांचे प्रेम खरे असते का? केवळ हिंदू आहे म्हणजे ‘काफीर’ आहे, या एकाच गोष्टीसाठी त्या मुलीला खोट्या खोट्या प्रेमात अडकवून तिचे शारीरिक शोषण केवळ पुढेमागे हिला ‘ब्लॅकमेल’ करता येईल, यासाठी करणारे खरे प्रेमी असतात का? जर प्रेम खरे आहे, तर मग त्या मुलीने किंवा मुलाने आपला धर्म त्यागून मुस्लीम धर्म स्वीकारावा, यासाठी भयंकर कटकारस्थान का रचले जाते? अपवाद असूही शकतो. काही आंतरधर्मीय विवाह खरेच प्रेमावर आधारित असतीलही. या अनुषंगाने हिंदू-मुस्लीम जोडप्यांमध्ये कोणी आपला धर्मत्याग केला आणि त्या कुटुंबातील पुढची पिढी आपली ओळख काय सांगते, हे पाहणेही लाक्षणिक आहे. माझ्यातरी पाहण्यात असेच आले आहे की, हिंदू-मुस्लीम विवाहामध्ये पती किंवा पत्नी कोणीही मुस्लीम असेल, तर त्यांचे अपत्य मुस्लीम म्हणूनच संस्कारीत होतात.
 
 

love jihad 
 
 
 
हिंदू मुलींसोबतच हे होते का? तर नाही. नुकतीच बी. नागराजू या मागासवर्गीय समाजातील तरुणाची हत्या झाली. कारण, त्याने आशरीन या मुलीशी जानेवारी महिन्यात प्रेमविवाह केला होता. नागराजू आणि आशरीन दोघांच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हताच. आशरीनच्या भावाने सय्यद मोबिन अहमद याने मोहम्मद मसुद अहमद याच्या साथीने दिवसाढवळ्या भरचौकात आशरीनसमोरच नागराजूवर रॉडने जीवघेणा हल्ला केला. त्यातच तो मृत पावला. आशरीनचे म्हणणे की, नागराजू याने सय्यद अहमदला सांगितले ही होते की, तो मुस्लीम धर्म स्वीकारायला तयार आहे. विषयांतर होईल, पण लिहायलाच हवे की, एका मागासवर्गीय तरुणाची हत्या झाली, पण कुठेही ‘डफली गँग’ बाहेर पडून रडगाणे गायली नाही. कदाचित रोहित वेमुलापेक्षा बी. नागराजूच्या जीवाची किंमत कमी असावी. असे का? तर तुष्टीकरणाचे कली फार बारकाईने विचार करतात. बी. नागराजू मागासवर्गीय समाजाचा आहे. त्याच्या मृत्यूबद्दल बोलले तर ‘मागासवर्गीय मुस्लीम भाई भाई हिंदू कोम कहा से आई?’ असा अजेंडा राबवणार्‍यांना जड जाणार! त्यामुळे बी. नागराजूच्या मृत्यूचा शोक करायला कुणालाही वेळ नाही. आता बी. नागराजूच्या परिवाराला काय न्याय मिळणार? त्याची पत्नी आयेशा तिचे काय होणार? एक ना अनेक प्रश्न आहेत. याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की,” ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटना घडत असतात. समाजाने आणि कायद्याने या ‘जिहादा’तून होणार्‍या धर्मांतराचा गंभीरतेने विचार करायला हवा. खूप कमी घटना उघडकीस येतात. चुकून ‘लव्ह जिहाद’ची घटना उघडकीस आली, तर समाजातील काही लोक आणि कायदा-सुव्यवस्थेत प्रशासनातील काही व्यक्ती गुन्हेगाराला सजा देण्यापेक्षा हिंदू -मुस्लीम म्हणत घटनेला वेगळाच रंग देण्याचा प्रयत्न करतात. कित्येक ठिकाणी, तर पोलीस तक्रार नोंदवण्यासाठीही भरपूर त्रास होतो. कारण, संबंधितांना वाटते की, यात हिंदू-मुस्लीम दोन धर्माच्या लोकांचा संबंध आहे, उगीच धार्मिक विवाद व्हायचा. अर्थात, त्यांच्या भितीतले तथ्य आणि सत्य हे त्या ‘लव्ह जिहाद’चा बळी गेलेल्या व्यक्तीच्या नरकयातनेपेक्षा कमीच महत्त्वाचे असते. त्याचाही विचार करण्याची वेळ आली आहे.”
 
 
 
‘लव्ह जिहाद’ असेल अथवा ‘नार्कोटिक जिहाद’चे विष समाजात पद्धतशीरपणे पेरले जात आहे. या ‘जिहाद’ने भारतीय हिंदू संस्कार आणि संस्कृतीला राष्ट्रीय सुरक्षेला एक आव्हानच दिले आहे. ‘लव्ह जिहाद’चा बिमोड कसा करता येईल? तर बहुतेक समाज अभ्यासकांचे म्हणणे आहे की, ‘लव्ह जिहाद’चे बळी जातात याला कारणीभूत कोण? बळी जाणारे? बळी घेणारे की आणखी कोण? ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणात बळी गेलेल्यांच्या पालकांनी वेळीच आपल्या पाल्याकंडे लक्ष दिले असते तर? घरातल्या सदस्यांना वेळ दिला असता तर? पालकांनी सजग राहून नियोजनबद्धरित्या आपल्या पाल्यांवर आपल्या धर्मसमाजाचे संस्कार करणे गरजेचे आहे. काय केल्यावर काय होऊ शकते, याबद्दल पाल्यांना कल्पना देणे आणि वास्तवातील दाखले द्यायला हवे. मुलांना इतके प्रेम आणि विश्वास द्यायला हवा की, आईबाबांचा विश्वास स्वप्नातही तोडायची त्यांनी हिंमत होऊ नये. कुटुंबाने समाजातल्या विविध सणसमारंभात सहभागी व्हावे. ”आमच्या आईबाबांनी आमच्यावर बंधनं लादली म्हणून आम्ही पण मुलांवर बंधनं लादायची का? आमची मुलं किंवा आमच्या घरातले तसे नाहीत हो. ते हुशार नाहीत. ते कधीच फसू शकत नाहीत. आम्ही त्यांना तसे संस्कार दिलेत.” असे बहुसंख्य लोक सर्रास म्हणताना आज दिसतात. पण, याबाबत सत्य काय तर? मुल किंवा घरातले फसवणार नाहीत, पण त्यांना नियोजनबद्धरितीने, संघटितरित्या फसवले गेले तर ‘ती सध्या काय करते?’ हे वाक्य खूप ‘फेमस’ आहे. मात्र, आपल्या घरातले काय करतात हे घरातल्यांनी जाणून घेतले तर? आपला मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडली, पण ते तसे प्रेमात पडेपर्यंत घरातल्यांना पत्ताच नसतो का? आता कुणी म्हणेल की, कामधद्यांमुळे कोण आणि किती वेळ, हे सगळे पाहणार? पण, ज्या घरातल्यांच्या सुखसोईसाठी आपण कष्ट करतो, त्याचे भवितव्य धोक्यात येऊ नये, यासाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. आपली कुटुंबसंस्था खरोखर आदर्श आहे. या कुटुंबसंस्थेच्या माध्यमातून समाजमाध्यमांतून धर्मसंस्कार करणे गरजेचे आहे. थोडक्यात, घरातल्या प्रत्येक सदस्यांना धर्म शिकवा, नाहीतर नको ते लोक त्यांना अधर्म शिकवतील. प्राचीन युगापासून सुत्र आणि मंत्रच आहे धर्मो रक्षति रक्षितः!
 
 
 
Powered By Sangraha 9.0