मनसे हा राज ठाकरेंचा भाडोत्री पक्ष- विनायक राऊतांचा टोला

04 May 2022 11:58:56

vr
 
 
 
 
 
मुंबई : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मनसेवर निशाणा साधत राज ठाकरेंना टोला लगावला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, 'मनसे हा देशातील एकमेव भाडेकरू पक्ष आहे, दर वर्षी निवडणुका आल्या की पक्ष भाड्याने द्यायचा अशी परंपरा राज ठाकरे पूर्वापार चालवीत आले आहेत, बंधू द्वेष आहे म्हणून भाजपची साथ देत आहेत, शरद पवारांसारख्या वरिष्ठ नेत्याचा अपमान केला त्याचा बदला आम्ही नक्की घेऊ' असा इशारा विनायक राऊतांनी राज ठाकरेंना दिला.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0